Walmik Karad Surrender Timeline: वाल्मीक कराड शरण येण्याआधी सकाळपासून काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Walmik Karad News: वाल्मीक कराड आज सीआयडी कार्यालयात हजर होत शरण आला. वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी सकाळपासून काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...
Walmik Karad Surrender Timeline
Walmik Karad SurrenderSaam Tv
Published On

Walmik Karad Surrender: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराड अखेर आज पोलिसांच्या शरण आला. पुण्यातील सीआयडीच्या समोर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज १२ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला आणि त्याने सीआयडीसमोर स्वत:ला शरण केले.

सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. वाल्मीक कराड पोलिसांच्या शरण आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाल्मिक कराडची सध्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. वाल्मीक कराडने यावेळी माझा संतोष देशमुख हत्याकांडाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. वाल्मीक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं? हे आपण जाणून घेणार आहोत....

Walmik Karad Surrender Timeline
Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार, सीआयडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

वाल्मीक कराड सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी काय घडलं?

सकाळी ७ वाजता: पुण्यातील सीआयडी ऑफिसबाहेर आज वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते एकत्रित आले.

सकाळी ९ वाजता: सीआयडी ऑफिसबाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त.

सकाळी १० वाजता: पुणे पोलिस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सीआयडी ऑफिसबाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल.

सकाळी ११ वाजता: १२ ते १ दरम्यान वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर.

Walmik Karad Surrender Timeline
Walmik Karad surrenders : वाल्मिक कराडच्या सरेंडरचे नाट्य, स्कॉर्पिओमधून लपून आला अन् पोलिसांनी पकडले, पाहा व्हिडीओ

दुपारी १२ वाजता: पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मीक कराड याने व्हिडिओ शेअर करत सांगितले.

दुपारी १२. १५ वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल.

दुपारी १ वाजता: सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराडची चौकशी सुरू.

Walmik Karad Surrender Timeline
Walmik Karad surrender : मोठी बातमी! वाल्मीक कराड पोलिसांना शरण

वाल्मीक कराड टाईम लाईन

संतोष देशमुख हत्याप्रकरणात रडारवर असलेला वाल्मीक कराड आज सीआयडीकडे शरण आले. ९ डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. वाल्मीक कराड याच्यावर पवनचक्की मालकाकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. परंतु, वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांची हत्या झाली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक कराड गायब होते

- ११ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड हे मध्य प्रदेशमधील उज्जैन या तीर्थक्षेत्रावर गेले असल्याचे काही फोटो आले होते समोर.

- ११ ते १६ डिसेंबर वाल्मीक कराड यांच्याशी कुठला ही संपर्क नाही.

- १७ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड यांचे मोबाईल लोकेशन पुणे होते.

- १७ डिसेंबर नंतर वाल्मीक कराड यांचा मोबाईल बंद.

- वाल्मीक कराड आज पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये हजर.

Walmik Karad Surrender Timeline
Walmik Karad surrenders : वाल्मिक कराडच्या सरेंडरचे नाट्य, स्कॉर्पिओमधून लपून आला अन् पोलिसांनी पकडले, पाहा व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com