Jitendra Awhad: 'जामीन मिळणारच, २-३ दिवसांपासून सेटींग', वाल्मीक कराड सरेंडर होताच जितेंद्र आव्हाडांचा दावा

Jitendra Awhad on Walmik Karad: वाल्मीक कराडवर कलम ३०२ का नाही? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल. या प्रकरणात २-३ दिवसांपासून सेटींग सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSaam Tv News
Published On

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हटल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडनं पुण्यात आत्मसमर्पण केलंय. पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर, मी शिक्षा भोगायला तयार आहे. असं सीआयडीला सरेंडर होण्यापूर्वी वाल्मीक कराडनं व्हिडिओद्वारे सांगितलं. सीआयडीला कराड शरण गेल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलीय. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराडवर कलम ३०२ का नाही? असा सवालही उपस्थित केलाय. तसंच या प्रकरणात २-३ दिवसांपासून सेटींग सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

'वाल्मीक कराड हे शरण जातील हे आधीच ट्विटद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला मी माहिती दिली होती. कारण या प्रकरणी २-३ दिवसांपासून अंतर्गत सेटींग सुरू होतं. जेव्हा मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, तेव्हा त्यांच्यात काहीतरी सेटींग झालेली असते. तो स्वता: हून सरेंडर होत आहे, ही मोठी गोष्ट आहे. काही गोष्टी पुसायला लागतात, काही गोष्ट सांगायला लागतात, आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल, ते करताना या गोष्टी पाहाव्या लागतात. ' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad
Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार, सीआयडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

वाल्मीक कराड फिलोसोफरसारखं बोलतो. माझ्यावर खंडणीचा खोटा आरोप आहे, संतोष देशमुख हत्येशी संबंध नाही. असं कराड म्हणतो. तो मोठा फिलोसोफर आहे. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधीक टीका केलीय. वाल्मीक कराडवर कलम ३०२ का नाही? खंडणीच्या गुन्ह्यात घेतलंय. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त ३ महिने. वाल्मीक कराडची जामीन तर होणारच असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

Jitendra Awhad
Walmik Karad surrender : मोठी बातमी! वाल्मीक कराड पोलिसांना शरण

आर्थिक साम्राज्याचं जुळवनी आहे

आर्थिक साम्राज्याची जुळवाजुळवी नक्की कुठून करण्यात येते, हा मोठा प्रश्न आहे. दिवसाला १०-२० कोटी येतायेत, जातायेत. पोलीस नेमके काय करत आहेत? कळेना. महाराष्ट्रात असं कधी घडलं नाही, की आरोपी इतके मोठे झाले आहेत. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com