Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Good News For Mumbaikar: सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील आयकॉनिक केबल स्टेड पूल लवकरच सुरू होणार आहे. येत्या १४ ऑगस्टला मुख्यमंत्री या पुलाचे उद्घाटन करणार आहेत.
Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार
LCLR BridgeSaam Tv
Published On

Summary -

  • १४ ऑगस्ट रोजी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील आयकॉनिक केबल स्टेड पुलाचं उद्घाटन.

  • फक्त ३५ मिनिटांत सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास करता येणार.

  • वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार.

  • पुलाची लांबी २१५ मीटर आणि उंची २५ मीटर इतकी आहे.

सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील आयकॉनिक केबल स्टेड पूल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. या पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या १४ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट होणार आहे. फक्त ३५ मिनिटांत याठिकाणी पोहचता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

सांताक्रूझ ते चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला ते पानबाई शाळा उन्नत रस्त्यासह धारावी ते वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या कलानगर जंक्शन उड्डाणपूल येत्या १४ ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा उड्डाणपूल सुरू होण्याची वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर चेंबूर येथील अमर महल ते पश्चिम द्रुतगती मार्ग हा प्रवास फक्त ३५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार
Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

एमएमआरडीएने सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडच्या सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला. याला अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात आयकॉनिक केबल स्टेड पूल उभारण्यात आला. हा पूल ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपात आहे. या पुलाची लांबी २१५ मीटर इतकी आहे. तर हा पूल जमिनीपासून २५ मीटर उंचीवर आहे. हा पूल देशातील तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार
Mumbai Drugs Racket : मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी नागरिकांकडून १.१५ कोटींचे कोकेन जप्त

हा पूल तयार झाल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फायदा वाहतूक कोंडी कमी होण्यास होईल. पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटेल. दरम्यान, बीकेसीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने कलानगर जंक्शन येथे ३ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. यामधील एक पूल असलेल्या धारावीकडून वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या उड्डाणपूलाचे काम अपूर्ण होते ते देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार
Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com