मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. NCB मुंबईचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कारवाईवरती शंका उपस्थित करत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी Nawab Malik वानखेडेंवरती अनेक आरोप केले आहेत. मलिकांपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही वानखेडेंवर आरोप केले.
हे देखील पहा -
तसेच मुंबईसह महाराष्ट्राला ड्रग्सचा Drugs विळखा पडलेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई बरबाद होत आहे. ड्रग्ज विरुद्ध लढण्याऐवजी हे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली होती. तसेच एखाद्या तपास अधिकाऱ्यांची जात धर्म काढणं चुकीचं असल्याचही फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेना नेते संजय राऊतांनी Sanjay Raut फडणवीसांवरती टीका केली आहे.
खंडणीखोरांसाठी फडणवीसांची वकिली -
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर महाविकास आघाडी सरकार विरोधातला एक आहे. स्वतः उद्धव ठाकरे देखईल तेच सांगत आहेत. तसेच हे सर्व महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आले नाही म्हणून राग काढला असल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवरती केला आहे.
तसेच महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, तो कुणापुढेही झुकणार नाही.या आधीच्या काळात देखील NCB ने अनेक प्रकरणात तपास केला होता त्या रिया चक्रवर्ती प्रकरणाच काय झालं ? त्यामुळं हे प्रकरण म्हणजे एका प्रकारची खंडणीखोरी आहे आणि अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.