नाशिक : जलयुक्त शिवाराची काम महाविकास आघाडी सरकारनं बंद केली, शेतकऱ्यांचं नुकसान केलं याबद्दल राज्यसरकारनं शेतकऱ्यांची माफी मागायला हवी तसेच शरद पवारांनी परमबीर सिंग (Sharad Pawar, Parambir Singh) कुठे आहेत विचारलं आहे तर त्यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh कुठे आहे याचं उत्तरही द्यावं असं वक्तव्य भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.
हे देखील पहा -
उपाध्य म्हणाले 'या देशात तूकडे तुकडे गॅंग प्रसिद्ध आहे, देशातील संस्थावर आरोप करायचे, अविश्वास तयार करायचा असे काम ही गॅंग करत आहेत, त्याला शिवसेना समर्थन ShivSena support करत आहे का? देशातल्या तुकडे तुकडे गॅंगला पूरक काम शिवसेनेला मान्य आहे का राष्ट्रवादी काँग्रेस NCP तपासात अडथळा आणत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले. तसेच ड्रग्स विरोधातील मोहीम चालवायची की नाही? अधिकारी हिंदू की मुस्लीम Hindu-Muslim याचा ड्रग्स Drugs मोहिमेशी काय संबंध? अधिकारी हिंदू की मुस्लीम याच्याशी काय देणं घेणं आहे? कारवाईबद्दल आक्षेप असेल तर कोर्टात जावं, ट्विटरवर बोलायची काय गरज? असही उपाध्ये म्हणाले.
हे गृहमंत्र्यांच अपयश -
राज्यसरकारला काहीच काम करता आलेलं नाही, सरकार अपयशी. त्यामुळे लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरु असून अजून टक्केवारी जमली नाही, म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नाही का एखाद्या महिले विषयी बोलणे, निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणे, गृहमंत्री फरार (Home Minister absconding) असणे यातून राज्याची बदनामी नाही होत का याचे उत्तर सरकारने द्यावे. तसेच शरद पवार विचारतात परमबीर सिंग कुठे आहेत, तर अनिल देशमुख कुठे आहे याचं उत्तरही पवारांनी द्यावं. रेव्ह पार्टी सुरू होती ही माहिती नवाब मलिक देतात, आणि गृहमंत्री ना माहिती नाही, हे गृहमंत्र्यांच अपयश असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.