Sanjay Raut : अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी; संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Sanjay Raut on Amol Kirtikar : अमोल कीर्तिकर यांच्या पराभवावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी; संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Sanjay RautSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईत मिळालेल्या ४ जागांपैकी ठाकरे गटाने तीन जागांवर विजय मिळवला. तर वायव्य मुंबईतील जागेवर अमोल कीर्तिकरांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. रविंद्र वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर अमोल कीर्तिकरांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, 'नरेंद्र मोदींचा पराभव झाला आहे. मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली आहे. भाजपला बहुमत मिळालेले नाही. कालपासून एनडीएचं सरकार चालू होतं. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या जीवावर सरकार उभं आहे, ते कधीही जाऊ शकतं'.

अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी; संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Celebrities Who Won Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटींचा दबदबा; कोणत्या जागेवरून कोणता तारा चमकला?

'ईडी , सीबीआयने जेवढं बहुमत आणायचं, ते त्यांनी आणलं आहे. मोदींचा पराभव झाला आहे. त्यांना सरकार बनवायचं असेल तर त्यांना बनवू द्या. आमच्याकडे देखील आकडा आहे. आम्ही २५० च्या जवळ आहोत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी हुकूमशाहीच्या विरोधात जायचा चंग बांधला आहे. तिसऱ्यांदा मोदींचं सरकार बनत नाही.

'अमित शहा यांना अधिक मताधिक्य मिळालं. राहुल गांधी यांनाही अधिक मताधिक्य मिळालं आहे. लोकांनी इंडिया आघाडीला जिंकवलं आहे. तुम्ही मान्य करा की, देव नाही, माणूस आहात. राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार असतील तर स्वागत आहे. आमच्यात नेतृत्वावरून लढाई नाही, असे ते म्हणाले.

अमोल कीर्तिकर यांचा पराभव ही चोरी; संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Ravindra Waikar : वायव्य मुंबईतील चुरशीच्या लढतीत रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी; अमोल कीर्तिकर पराभूत

वायव्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. 'अमोल किर्तीकर यांचा परभव ही चोरी असल्याचे राऊतांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com