KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

KDMC Deputy Commissioner: बेकायदेशीर पदोन्नतीच्या आरोपांनंतर संजय जाधव यांना उपायुक्त पदावरून हटवण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात अनिल परब यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलीय.
KDMC Deputy Commissioner:
KDMC headquarters where action was taken against Sanjay Jadhav for illegally holding the Deputy Commissioner post.saam tv
Published On
Summary
  • संजय जाधव यांचा उपायुक्त पदभार बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न

  • आमदार अनिल परब यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून शासन नियमभंगाचा आरोप केला.

  • या घटनेनंतर KDMC मध्ये मोठी प्रशासकीय खळबळ

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठी प्रशासकीय खळबळ उडाली आहे. महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडून बेकायदेशीररित्या सांभाळला जाणारा उपायुक्त पदभार अखेर काढून घेण्यात आला असून त्यांना तात्काळ मूळ पदावर रुजू करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी हा विषय जोरदारपणे मांडत, शासन नियमांचे उल्लंघन करून तांत्रिक पदावरून अ-तांत्रिक पदावर झालेली ही पदोन्नती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी कारवाईची पावले उचलत जाधव यांचा उपायुक्त पदाचा कार्यभार तातडीने काढून टाकला.

महत्वाच्या विभागांचा कारभार होता जाधवांकडे उपायुक्त पदावर असताना संजय जाधव यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, शिक्षण- क्रीडा- सांस्कृतिक, समाज विकास, मागासवर्गीय कल्याण आणि रात्र बेघर निवारा अशा अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी होती. तांत्रिक पदावरून थेट अशाप्रकारे अ-तांत्रिक उच्च पदांवर नियुक्ती करणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

KDMC Deputy Commissioner:
KDMC Elections: निवडणूकीसाठी आराखडा आणि नकाशे जाहीर; प्रभागांची संख्या 133 वर...

संजय जाधव तांत्रिक पदावरून उद्यान अधीक्षक भरती झालेले असताना तांत्रिक अधिकारी अ-तांत्रिक पदावर नियुक्त होऊ शकत नाही, असा स्पष्ट नियम आहे. तरीही आयुक्तांच्या आशिर्वादाने जाधव यांना पदोन्नती व वेतनवाढ देण्यात आल्याचा आरोप आमदार परब यांनी केला. या प्रकरणावर अनेक तक्रारी असून जाणीवपूर्वक जाधव यांना पाठीशी घातलेल्या संबंधित सचिवांचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी मांडण्यात आली आहे.

संजय जाधव यांनी सुमारे सहा वर्षे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळल्याची माहितीही विधानसभेत अधोरेखित करण्यात आली. राजकीय वरदहस्तामुळेच जाधव उच्च पदांपर्यंत पोहोचल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. उपायुक्त पदावरून आणखी पुढे जाऊन अतिरिक्त आयुक्त बनण्याची इच्छा जाधव यांनी बाळगली होती. मात्र विधानसभेत मुद्दा मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, मूळ पदावर बदली झाल्यानंतर ते धावपळीत दिसत असल्याची माहिती मिळते.

KDMC Deputy Commissioner:
KDMC Election : श्रीकांत शिंदेंना जोरदार धक्का, विश्वासू नेत्याने साथ सोडली, भाजपचे कमळ घेतलं हातात

संजय जाधव यांनी सुमारे सहा वर्षे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळल्याची माहितीही विधानसभेत अधोरेखित करण्यात आली. राजकीय वरदहस्तामुळेच जाधव उच्च पदांपर्यंत पोहोचल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. उपायुक्त पदावरून आणखी पुढे जाऊन अतिरिक्त आयुक्त बनण्याची इच्छा जाधव यांनी बाळगली होती. मात्र विधानसभेत मुद्दा मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, मूळ पदावर बदली झाल्यानंतर ते धावपळीत दिसत असल्याची माहिती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com