KDMC Elections: निवडणूकीसाठी आराखडा आणि नकाशे जाहीर; प्रभागांची संख्या 133 वर...

KDMC Elections: आगामी निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यात येणार असून निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये 11 ने वाढ केल्याने आता प्रभागांची संख्या 122 वरून 133 झाली आहे.
KDMC Elections: Announce plans and maps for the election
KDMC Elections: Announce plans and maps for the electionSaam Tv
Published On

कल्याण: केडीएमसीची निवडणूक (KDMC Elections) ऑक्टोबर 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 2015 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची (KMDC) निवडणूक झाली होती. त्यावेळी 122 प्रभागांसाठी ही निवडणूक (Elections) घेण्यात आली. आता आगामी निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यात येणार असून निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये 11 ने वाढ केल्याने आता प्रभागांची संख्या 122 वरून 133 झाली आहे. (Announce plans and maps for the election of Kalyan Dombivali Municipal Corporation)

हे देखील पहा -

यावेळी निवडणूक 44 पॅनेलमध्ये (Panel) होणार असून तीन प्रभागाचे एकूण पॅनल 43 आहेत, तर एक पॅनल हा चार प्रभागांचा आहे. तर प्रभाग क्रमांक ४४ म्हणजेच नांदिवली तर्फे अंबरनाथ चिंचपाडा-आशेळे-माणेरे-वसार-द्वारली ह्या मधून 4 नगरसेवक निवडणूक येणार आहेत. दरम्यान 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार असून, प्राप्त हरकती 16 फेब्रुवारीला आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारीला या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असून, सुनावणी नंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी 2 मार्च 2022 ला निवडणूक आयोगाला पाठवाव्या लागणार आहेत.

KDMC Elections: Announce plans and maps for the election
Solapur District Milk Union Election: दिलीप माने, काका साठे, आवताडे, माळी यांचे अर्ज बाद

केडीएमसी मध्ये एकूण लोकसंख्या : 15 लाख 18 हजार 762

अनुसूचित जाती लोकसंख्या : 1 लाख 50 हजार 171

अनुसूचित जमाती लोकसंख्या : 42 हजार 584

एकूण प्रभाग : 133

एकूण पॅनल : 44

3 चे पॅनलचे प्रभाग : 43

4 चा पॅनल प्रभाग : 1

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com