Rohit Pawar News : समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुरावेही दिले

Rohit Pawar On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुरावेही दिले
Rohit Pawar On Samruddhi Mahamarg Saam TV
Published On

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महामार्गाच्या कामातून अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सर्वसामान्यांची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आरोपांसोबत रोहित पवार यांनी थेट पुरावेही सांगितले आहेत. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुरावेही दिले
Maharashtra Politics : वसंत मोरे आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार, पुण्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार

आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी अधिकारी राधेशाम मोपालवार यांचे नाव घेत समृद्धी महामार्गात ३००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले, "समृद्धी महामार्ग कशाप्रकारे भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता कोणी किती जमीनी कशा विकत घेतल्या या खोलात मी जाणार नाही. फक्त या अधिकाऱ्यांच्या संबंधित एक छोटे उदाहरण सांगतो"

"२०१८ ला समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Mahamarg) टेंडर काढण्यात आलं होतं. तेव्हा या टेंडरची किंमत ४९ हजार कोटी इतकी होती. त्यानंतर ४ महिन्यांतच नवं टेंडर काढण्यात आलं. तेव्हा या टेंडरची एकूण किंमत ५५ हजार कोटी रुपये इतकी करण्यात आली. म्हणजेच काय तर ४ महिन्यात टेंडरची एकूण किंमत ६०८८ कोटी रुपयांनी वाढली".

"त्यामुळे 'समृद्धी' सामान्यांची झाली की अधिकारी तसेच नेत्यांची झाली हे आपल्याला यावरून कळतं. अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्या स्वत:च्या नावावर १५०० कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर १५० कोटी तर तिसऱ्या बायकोच्या २०० कोटींची मालमत्ता आहे", असा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला.

इतकंच नाही, तर "अधिकारी मोपलवार यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींच्या नावांवर जवळपास ८५० कोटी इतकी मालमत्ता आहे. त्यांचे भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावरही ५० कोटींची मालमत्ता आहे. अशा पद्धतीने हा आकडा एकत्रित केला तर तो ३००० कोटींच्या आसपास जातो".

"एकाबाजूने तुम्ही गरीब महिलांना १५०० रुपये देण्याचं सोंग करायचं आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्याला ३००० कोटी लाटायला द्यायचे", अशी टीकाही रोहित पवार यांनी सरकारवर केली. तसेच सरकारच्या वतीने मुलींच्या शिक्षणाबाबत घेण्यात आलेला निर्णय हा घाईघाईचा आहे. यामध्ये कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेला आहे. अनेक कुटुंबांना ५ ते १० हजार रुपये भरणे देखील कठीण आहे. त्यामुळे या योजनेचा पुनर्विचार करा, असंही रोहित पवार म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुरावेही दिले
Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी, आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पडद्यामागे काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com