Pune News: दिव्यांग-गरजू विद्यार्थ्यांची दिवाळी झाली गोड, सकाळ सोशल फाउंडेशन आणि श्री मुकुंद भवन ट्रस्टने दिले नवीन कपडे भेट

Pune News: सकाळ सोशल फाउंडेशन आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांनी कोथरुडमधील अंध शाळेत दिवाळीनिमित्त ५३० दृष्टिहहीन आणि गरजू विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Pune News:
Pune News: Saam tv
Published On

Pune News:

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशन आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांनी कोथरुडमधील अंध शाळेत दिवाळीनिमित्त ५३० दृष्टिहहीन आणि गरजू विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दृष्टिहहीन आणि गरजू विद्यार्थ्यांना श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त खुशबू लोहिया, शरद सारडा व कुशल कारवा यांच्या हस्ते नवीन कपडे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक दामोदर सरगम, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी व पालक यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दामोदर सरगम, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. (Latest Marathi News)

या विद्यार्थ्यांमध्ये 'दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाईंड' संस्था संचालित कोथरूड येथील (मुलींची) पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क येथील (मुलांची) पुणे अंधशाळा आणि 'बालग्राम एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेजेस, महाराष्ट्र' या संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या पुण्यातील येरवडा, शिवाजीनगर, पनवेल, कोल्हापूर व ठाणे अशा 5 शाखांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News:
Central Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाहतूक खोळंबल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

याप्रसंगी श्री मुकुंद भवन ट्रस्ट च्या विश्वस्त खुशबू लोहिया यांनी सांगितले की, 'दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, या उद्देशाने'सकाळ सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थी आणि इतर गरजू मुलांना देखील नवीन कपड्याच्या स्वरूपात मदत केली. श्री मुकुंद भवन ट्रस्टकडून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सकाळ सोशल फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते'.

Pune News:
Sangli Accident: जबलपूरजवळ सैन्य दलाच्या वाहनाला अपघात; सांगलीतील पॅरा कमांडोचा मृत्यू

दरम्यान, 'दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाईंड, ट्रस्ट' या संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पुणे अंध शाळांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील गरजू पाच ते अठरा वयोगटातील जवळपास तीनशेहून अधिक अंध विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. या संस्थेद्वारे अंध मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे पालन-पोषण, विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण, कौशल्याधिष्टित व्यवसायभिमुख प्रशिक्षण, हस्तकला, संगीत कला प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.

तसेच, 'बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेज,महाराष्ट्र्र' संचालित बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेज, येरवडा शाखेत मुलांचे आणि मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांचे संगोपन आणि पालन-पोषणाचे काम केले जाते. त्यात दिवाळीसाठी नवीन कपडे मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदित झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com