Mumbai Shawarma News: 'साम'चा दणका! शोरमा खाऊन तरुणाच्या मृत्यूनंतर मानखुर्दमध्ये BMC ची धडक कारवाई

BMC Action on Mankhurd's Chicken Shawarma Vendor: मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरात शोरमा खाल्ल्यानं १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेचं वृत्त साम टीव्हीनं प्रसारित केल्यानंतर मुंबई महापालिकेनं मानखुर्दमध्ये धडक कारवाई केली आहे.
Mumbai Shawarma News: 'साम'चा दणका! शोरमा खाऊन तरुणाच्या मृत्यूनंतर मानखुर्दमध्ये BMC ची धडक कारवाई
BMC took action on street food vendor after 19 years old boy dies after eating shawarma in MumbaiSaam tv
Published On

मुंबई : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरात शोरमा खाल्ल्यानं १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेचं वृत्त साम टीव्हीनं प्रसारित केल्यानंतर मुंबई महापालिकेनं मानखुर्दमध्ये धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र नगरातील फेरीवाल्यांना पालिकेनं हटवलं आहे.

Mumbai Shawarma News: 'साम'चा दणका! शोरमा खाऊन तरुणाच्या मृत्यूनंतर मानखुर्दमध्ये BMC ची धडक कारवाई
Chicken shawarma : शोरमा खाणं मुंबईकर तरुणाच्या जीवावर बेतलं; पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

चिकन शोरमा खाल्ल्यानंतर १९ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला जीव गमवावा लागला. मुंबईतील मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात शोरमा विक्रेत्याकडील चिकन शोरमा खाल्ल्यानंतर प्रथमेशचा मृत्यू झाला होता. या घटनेचं वृत्त साम टीव्हीनं प्रसारित केलं होतं. त्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ट्रॉम्बे पोलिसांनी शोरमा विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. शोरमातील चिकन खराब असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

BMC कडून धडक कारवाई

शोरमामुळं १९ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागल्यानंतर सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबई महापालिकेनं धडक कारवाई केली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात पालिकेच्या एम पूर्व विभागानं १५ फेरीवाल्यांवर कारवाई करत, त्यांना हटवले आहे.

महापालिकेच्या गाइडलाइन्स

चिकन शोरमा खाऊन तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने तात्काळ 'गाइडलाइन्स' जारी केल्या. उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, असा सल्ला दिला आहे.

Mumbai Shawarma News: 'साम'चा दणका! शोरमा खाऊन तरुणाच्या मृत्यूनंतर मानखुर्दमध्ये BMC ची धडक कारवाई
Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...
  • उघड्यावरील पेय आणि खाद्यपदार्थ खाऊ नका

  • घरात शिजवलेले, ताजे अन्नपदार्थ खा

  • शिजवलेलं अन्न झाकून ठेवा. शिळं अन्न खाऊ नका

  • चिकन, मटण-मासे स्वच्छ आणि शिजलेले आहेत याची खात्री करावी. त्यानंतरच सेवन करावे.

  • लहान मुलांनी रस्त्यावरील पदार्थ खाऊ नयेत. पालकांनी त्याकडे लक्ष द्यावं

  • गर्भवती महिलांनी स्वच्छता आणि पौष्टीक आहार घ्यावा.

  • भाजीपाला, फळं स्वच्छ पाण्यानं धुवूनच खावीत.

  • उलटी, जुलाब, मळमळ आणि कावीळसारखी लक्षणं दिसल्यास पालिका रुग्णालये किंवा डॉक्टरांकडे जावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com