मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच मोठी रंगत आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिका सेवेतील राजीनामा अद्यापही मंजूर केलेला नाही. ऋतुजा लटके यांना शिंदे गटातून लढावे यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव देखील टाकला जात आहे अशीही चर्चा आहे.
त्यामुळे ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चाही सुरु झाली होती. यावर आता ऋतुजा लटके यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. सोबत त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टमुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मी एकनिष्ठ आहे, मी अंधेरीची पोटनिवडणूक लढती तर ती मशाल या चिन्हावरच लढेन, असंही त्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ती उद्या ११ वाजता न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होणार आहे.
लटके या मुंबई महापालिकेत कार्यरत असून दिवगंत पती रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे सामना?
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ताज्या माहितीनुसार भाजप-शिंदे गट युतीमध्ये अंधेरीची जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीत उमेदवार मुरजी पटेल की अन्य कोण यावर संध्याकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.