Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे थेट सामना? भाजप निवडणूक न लढण्याची दाट शक्यता

भाजप या निवडणुकीत आपला उमेदवार मागे घेत शिंदे गटाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSaam Tv
Published On

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप अंधेरी पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Shivsena : उद्धव ठाकरेंच्या अडचणी संपेनात! 'मशाल' चिन्हावरही या पार्टीचा दावा

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गट (Eknath Shinde) थेट समोरासमोर येणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजप या निवडणुकीत आपला उमेदवार मागे घेत शिंदे गटाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. (Latest Marathi News)

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ताज्या माहितीनुसार भाजप-शिंदे गट युतीमध्ये अंधेरीची जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीत उमेदवार मुरजी पटेल की अन्य कोण यावर संध्याकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Andheri By-Election : CM शिंदेंचा मोठा प्लॅन; थेट ठाकरेंचा उमेदवारच फोडणार?

रमेश लटके यांच्या निधनाने जागा रिक्त

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी युतीच्या बंडखोर उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव केला होता. मात्र दुर्दैवाने मे 2022 मध्ये रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली. याच जागेसाठी आता रमेश लटके आणि मुरजी पटेल यांच्यात सामना रंगणार आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण आता त्यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. कारण, ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com