Shivsena : उद्धव ठाकरेंच्या अडचणी संपेनात! 'मशाल' चिन्हावरही या पार्टीचा दावा

मशाल चिन्ह आमचं आहे असा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Samata Party Claim on mashal symbol
Samata Party Claim on mashal symbol Saam TV
Published On

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरील अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अंधेरी पोटनिवडणूक (Andheri) तोंडावर आली असताना, पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील राजीनामा अजून मंजूर झालेला नाही. दुसरीकडे पक्षाला मिळालेल्या नवीन चिन्हावर सुद्धा आता समता पार्टीने दावा केला आहे. मशाल चिन्ह आमचं आहे असा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Samata Party Claim on mashal symbol
Andheri By-Election : CM शिंदेंचा मोठा प्लॅन; थेट ठाकरेंचा उमेदवारच फोडणार?

उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह आपलं असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आज निर्णय अपेक्षित असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली आहे.

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी मशाल चिन्ह आपलं असल्याचा दावा केलाय. २००४ मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केलं, असं देवळेकर यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

मशाला चिन्हासाठी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचं देवळेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला बहाल केलेलं मशाल हे चिन्हही आता जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Samata Party Claim on mashal symbol
Andheri By-Election : अंधेरी पोट निवडणुकीसाठी भाजप-महायुतीचा उमेदवार ठरला

ठाकरे गटाच्या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच दोन्ही गटाकडून आता उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजप-महायुतीकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. कारण, ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com