बेडरुममध्ये कोण काय करतंय यासाठी आपण राजकारणात आहात का? रुपाली पाटील चित्रा वाघांवर भडकल्या

Nana Patole Viral Video Clip : चित्रा वाघ यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आता मैदानात उतरल्या आहेत.
Rupali Thombare, Nana Patole & Chitra Wagh
Rupali Thombare, Nana Patole & Chitra WaghSaam TV

रुपाली बडवे

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेचे झोड उठवली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही नाना पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता. चित्रा वाघ यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) आता मैदानात उतरल्या आहेत. "बेडरूममध्ये कोण काय करतंय, यासाठी आपण राजकारणात आहात का?" असा सवाल करत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. (Rupali Thombare Patil News In Marathi)

हे देखील पाहा -

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, भाजपच्या चित्राताईंनी कॉंग्रेसच्या नाना पटोलेंचा एक तथाकथित हा खाजगी व्हिडिओ शेयर केला आहे. मुळात आपण राजकारणात कशासाठी आलो आहोत? विरोधकांची अनैतिक संबंध काढणं, ताकझाक करणं हा आपला विकास आहे का? तुमच्याही पक्षातल्या (भाजपच्या) नेत्यांचे खाजगी व्हिडिओ बाहेर आले आहेत. कोणाच्याही खाजगी आयुष्यातले व्हिडिओ अशाप्रकारे पोस्ट करता येत नाही. आपल्याला कुणी अधिकार दिला की, त्याच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ अशाप्रकारे शेयर कारायचा? मुळात तुमच्या लोकांचे जे अनैतिक सबंध आहेत, ज्या महिला तक्रार करतात त्यांनी तो दिला. पण, हा व्हिडिओ त्या महिलेने दिलेला नाही. तरिही तुम्हाला विरोधकांच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ पाठवणे, ते बघणे, त्यांचे कुठे-कुठे अनैतिक संबंध आहे हे बघणे हे तुम्हाला शोभत नाही अशी टिका त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.

पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या समाजात अनेक प्रश्न आवासूव उभे आहेत. परंतू सातत्याने भाजकडून महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न सोडून लोकांच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. ते राजकारणी असले तरी ते माणसं आहे. त्यांनी त्यांच आयुष्य आहे. कुणावर जर खरा अन्याय झाला असेल करत त्याची पडताळणी करुनच राजकारणी नेत्यांनी बोललं पाहिचे. पूजा राठोड प्रकरणातही तसंच झालं. संविधान आहे. त्यानुसार चालावं लागतं. आज ज्या नेत्यावर आले होते ते भाजमध्ये आले आहेत ते वॉशिंगमशीनसारखे स्वच्छ झाले आहेत, ही कुठली पद्धत आहे? राजकारणात विकास सोडून कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं बेडरुममध्ये काय करतंयं यासाठी आपण राजकारणात आहोत का? असा खरमरीत सवाल त्यांनी चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

Rupali Thombare, Nana Patole & Chitra Wagh
...आम्ही १०० टक्के खुश नाही; ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ पंतप्रधानांकडे करणार 'ही' मागणी

दरम्यान, सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, 'सदर व्हिडीओवरून आमच्या तक्रारी सुरू आहेत. आमच्या लीगल सेलकडून तक्रारी करण्याचे सुरू आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपचे कटकारस्थान आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे. मला बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे. त्याच्या विरोधात कारवाई करण्याचं काम सुरू आहे असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com