पक्षातील वाद रस्त्यावर! आधी हाणामारी नंतर RPI जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल

RPI Athawale Faction Internal Conflict In Dombivli: डोंबिवलीत आरपीआय आठवले गटातील अंतर्गत वाद चिघळला असून युवक जिल्हाध्यक्षासह चार जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
kalyan news
kalyan newssaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मधील अंतर्गत वाद आता चांगलाच चिघळला असून त्याचे पडसाद थेट रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यात उमटले आहेत. पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव यांच्यासह चार जणांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kalyan news
Mumbai Local: पश्चिम रेल्वे खोळंबली! वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटली; प्रवासी रूळावरून चालत निघाले, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील पदाधिकारी विकास खैरनार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कर्वे रोड परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी खैरनार यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी जय जाधव, संदीप पाईकराव, नितीन इंगोले आणि डॉ. सुभाष अंभोरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे.

kalyan news
KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

काही दिवसांपूर्वीच डॉ. सुभाष अंभोरे यांनी विकास खैरनार यांच्याविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात खैरनार यांना अटकही झाली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

kalyan news
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक नामंजूर तरीही भाजपचा विजय? कसा ते जाणून घ्या D_Code मध्ये...पाहा व्हिडिओ

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील पदनियुक्तीवरूनच हा वाद पेटला असून, गटबाजीमुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस तपासातून नेमके काय घडले याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com