ठाण्यातील 'त्या' रिक्षाचालकाला अटक, मुलीला रिक्षाने नेलं हाेते फरफटत; पाहा व्हिडिओ

रिक्षाचालकाकडून दारुच्या नशेत मुलीला फरफटत नेल्याची कबुली
 Thane News
Thane NewsSaam Tv
Published On: 

ठाणे - महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण काल ठाणे (Thane) स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्टेशन परिसरात एक रिक्षा चालकाने विद्यार्थीनीची छेड काढली इतकेच नाही तर तिला फरपटत नेल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलगी जखमी झाली होती. (Thane Latest News)

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला होता. त्यानंतर अखेर या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकाकडून देण्यात आली आहे. सदरचा रिक्षाचालक नवी मुंबई येथील दिघा येथील हिवाशी आहे.

 Thane News
Weather Update : परतीचा पाऊस कधी थांबणार? हवामान खात्याने सांगितली तारीख

नेमकं प्रकरण काय? 

काल सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना विद्यार्थीनीची छेड काढली इतकेच नाही तर तिला फरपटत नेलं. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्यानं ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक तिथून फरार झाला. दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुलीच्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली. पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज जमा केलं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अखेर तब्बल 24 तासांनी पोलिसांना या रिक्षाचालकाला अटक करण्यात यश आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com