Malin Incident : पहाटेच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळली, माळीणकरांची चिंता वाढली

नव्यानं माळीण गावचं पुनर्वसन झालं. रस्ते, घरं सुसज्य बांधण्यात आली तेथेच ही घटन घडली.
malingaon
malingaonsaam tv

Malingaon News : माळीण दुर्घटनेनंतर पुनर्वसन झालेल्या ठिकाणी आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या परिसराची संरक्षण करणारी सरंक्षण भिंत कोसळली. दरम्यान आजही परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. (Maharashtra News)

malingaon
Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

नव्याने माळीण गावचे पुनर्वसन झालेल्या गावच्या मध्यावर रस्ते आणि घरांना संरक्षण मिळावे यासाठी कॉक्रिटमध्ये बांधण्यात आलेली हाेती. ही भिंत १० फुट उंच आणि ५० फुट लांबीची आहे. ही भिंत कोसळल्याने घरांच्या बाजुचा मातीचा भरावही मोकळा झाला आहे.

malingaon
Mumbai High Court News : विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विराेध, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

संरक्षण करणारी भिंत खचल्याने तसेच अजून येथे पाऊस सुरु असल्याने धोका कायम असल्याने शासकीय यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे.

malingaon
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक गटास माेठा धक्का, 'राजाराम' चे 1272 सभासद अपात्र; सतेज पाटील कारखाना ताब्यात घेणार?

नव्यानं माळीण गावचं पुनर्वसन झालं. रस्ते, घरं सुसज्य बांधण्यात आली. या गावाला आणि घरे रस्त्यांना कॉक्रिटमध्ये संरक्षण भिंती उभारण्यात आली. ज्या भिंती माळीण संरक्षण करत आहे त्याच भिंती कुचकामी ठरत असल्याने माळीणकरांचे (villagers) वास्तव्य सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतं

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com