Pune News : लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाकडून सुटका, पुण्यातील भवानीपेठेतील घटना

Pune News : जवळपास २० मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली.
Pune NEws
Pune NEws Saam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News :

लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकला होता. जवळपास २० मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याचा फोन आला होता. अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आल्या. (Mumbai News)

Pune NEws
Jayant Patil News: BMCने भूखंड-उद्याने दत्तक देण्याचं धोरण रद्द करावं; जयंत पाटील यांची मागणी

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा सहा मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. (Latest Marathi News)

Pune NEws
Pm Modi News: वाराणसीत PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घेतली उडी

लिफ्ट रुममधे जाऊन तांत्रिकरित्या काम पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची २० मिनिटात सुखरुप सुटका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com