Ranjangaon : साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी

Pune Ranjangaon Mahaganpati Mandir : १५ एप्रिलपासून बंद असलेल्या अष्टविनायकातील श्री महागणपती मंदिराचे दरवाजे १ ऑगस्टपासून पुन्हा उघडण्यात आले. पहाटेच भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली. विकासकामे सुरू राहणार असली तरी दर्शनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मंदीर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Ranjangaon :  साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी
Ranjangaon : साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दीchatgpt
Published On

पुण्यातील प्रसिद्ध रांजणगावाचे गणपती मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे . तब्बल साडे तीन महिन्यांनंतर भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भाविकांनी महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले झाले आहेत.

मंदिर डागडुजीकरिता काही महिने बंद करण्यात आले होते. पुरातत्त्व विभागाच्या जतन व संवर्धनाच्या कामांमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले मंदिर आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी भाविकांनी श्री महागणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

Ranjangaon :  साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी
Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

अष्टविनायकांपैकी अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री महागणपती मंदिरात पुरातत्त्व विभागामार्फत जतन व संवर्धनाची विकासकामे सुरू होती. त्यामुळे १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. नियोजित कामांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज १ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता मंदिराचे दरवाजे पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले.

पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली. मंदिरात सामूहिक आरती, गणेश याग, महापूजा आणि शेजारती असे नियमित धार्मिक कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले आहेत. विकासकामे पुढील काही काळ सुरू राहणार असली, तरी भाविकांच्या दर्शनात कोणतीही अडचण येणार नसल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

Ranjangaon :  साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी
Rain Alert : आजही पावसाचा हाहाकार, विदर्भासह राज्यातील १३ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

मंदिर जरी खुले झाले असले तरीही त्याचे अंतर्गत विकासकामे हे चालू राहणार आहे. काम पुर्ण व्हायला आणखी अवधी लागणार आहे. तरीही भाविकांच्या दर्शनात कोणतीही बाधा येणार नाही. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंदिर परिसरात काम चालू असल्याने ग्रामस्थ आणि भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com