राणा सूर्यवंशीला Y प्लस सुरक्षा कोणी आणि कोणत्या निकषांवर दिली? शिंदे गटाकडून चौकशीची मागणी

Rana Suryavanshi Security Controversy: राणा सूर्यवंशी यांना Y+ दर्जाची पोलीस सुरक्षा कोणत्या निकषांवर देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. या सुरक्षेसाठी कोणाची शिफारस होती आणि मंजुरी देताना कोणत्या बाबींचा विचार करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय.
Rana Suryavanshi Y+ Security Row | Who Approved The Police Protection?
Rana Suryavanshi Y+ Security Row | Who Approved The Police Protection?saam tv
Published On: 
Summary
  • पोलीस सुरक्षेवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

  • सुरक्षा मंजुरीसाठी कोणत्या राजकीय व्यक्तीची शिफारस होती का?

  • महसूल विभागाची कथित फसवणूक आणि उद्योजकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राणा सूर्यवंशी याला देण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या पोलीस सुरक्षेवरून आता गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कोणत्या निकषांच्या आधारे आणि कोणाच्या शिफारशीवरून राणा सूर्यवंशी याला एवढ्या उच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी रवींद्र धंगेकरने पत्रकार परिषदेत करण्यात आली. राणा सूर्यवंशी हा नेमका कोण आहे? त्याची उद्योजक म्हणून नेमकी पात्रता काय? त्याला सुरक्षा देण्यासाठी कोणत्या राजकीय व्यक्तीने शिफारस केली होती का? सुरक्षा देण्यापूर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Rana Suryavanshi Y+ Security Row | Who Approved The Police Protection?
Beed : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल, महिलेच्या घरात घुसला अन्...

याशिवाय कथित बेकायदेशीर हेलिपॅड, पुण्यातील अमनोरा पार्क परिसरातील मालमत्ता खरेदी, महसूल विभागाची कथित हजारो कोटी रुपयांची फसवणूक आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याचे सांगून काही उद्योजकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोपही करण्यात आले. या सर्व प्रकरणांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, पुढील एक-दोन दिवसांत अधिक माहिती आणि कागदपत्रांसह पुन्हा पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Rana Suryavanshi Y+ Security Row | Who Approved The Police Protection?
Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

राणा सूर्यवंशीला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर राणा सूर्यवंशी याला मिळालेल्या वाय प्लस सुरक्षेची प्रक्रिया, त्यामागील राजकीय शिफारस, सुरक्षा मंजूर करणारे अधिकारी आणि सुरक्षेचा कथित गैरवापर या सर्व बाबींची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. सुरक्षा देताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कथित बनावट हल्ला घडवून आणणे आणि पोलीस बळाचा गैरवापर केल्याच्या आरोपांप्रकरणी राणा सूर्यवंशी याला तातडीने अटक करावी, अशी स्पष्ट मागणी रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.