आवाज आला, पिस्तुल मिळाली पण पुंगळी नाही! मग गोळीबाराचे काय? राणा सूर्यवंशी प्रकरणाची "विसंगती" आणखी खोल

Rana Suryavanshi Case: बारामतीतील राणा सूर्यवंशी कथित हल्ला प्रकरणात घटनास्थळी पिस्तूल सापडले, मात्र पुंगळी आढळली नाही. पोलिसांनी पिस्तूल बॅलेस्टिक तपासणीसाठी पाठवले असून गोळीबाराच्या दाव्याची चौकशी सुरू आहे.
RANA SURYAVANSHI CASE
RANA SURYAVANSHI CASEsaam tv
Published On: 

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या "कथित" हल्ल्याच्या प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, जसा तपास पुढे जातोय तसे या प्रकरणी नवनवीन खुलासे आणि धागेदोरे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. व्ही आय पी व्यक्तींना जसे पोलीस संरक्षण मिळते, तशी हाय-प्रोफाइल सुरक्षा मिळवण्याच्या हौशेपोटी सूर्यवंशी ने स्वतःवरच जीवघेण्या हल्ल्याचा कट रचला होता अशी चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक कंगोरा समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेमध्ये राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या कारवाईचा "बदला" घेण्यासाठी त्यांनीच हे"कथित" प्रकरण त्यांच्या मित्रांच्या सहकाऱ्याने घडवून आणलं का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

RANA SURYAVANSHI CASE
Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

पिस्तुल मिळाली पण पुंगळी नाही मग गोळीबार झाला का नाही?

१८ ऑक्टोबर रोजी राणा सूर्यवंशी हे भिगवण वरून बारामती मध्ये जमिनीची पाहणी आणि नंतर ती खरेदी करण्यासाठी आले होते. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर राणा सूर्यवंशी यांनी बारामती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, "अज्ञात व्यक्तींनी आम्ही तुमचे चाहते आहोत तुम्हाला फुलांचा बुके द्यायचा आहे" असं सांगत, माझ्यावर गोळीबार केला.

RANA SURYAVANSHI CASE
Amit Thackeray : अमित ठाकरे 'अॅक्शन मोड'वर; त्या मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एकदम 'कडक' मेसेज

यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. पंचनामा करताना पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्तूल मिळून आली. विशेष म्हणजे सगळा परिसर पछाडून काढला पण पोलिसांना त्याच पिस्तुल ची एकही पुंगळी आढळून आली नाही. आता तक्रारीनुसार गोळीबार झाला पण मग पिस्तुलातून निघालेली गोळी नेमकी गेली कुठे याचा शोध घेतला जातोय. यापुढे सखोल तपासासाठी पोलिसांनी पिस्तूल चे आता "बॅलेस्टिक फॉरेन्सिक" म्हणजेच गोळीबाराशी संबंधित पुराव्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे आता घटनास्थळी खरचं गोळीबार झाला का नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

RANA SURYAVANSHI CASE
Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

आरोपींना अटक पण गोळीबार केला कोणी?

हल्ल्यात वापरलेले सत्तुर आणि पिस्तूल हे दोन्ही शस्त्र पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ज्ञानदेव शिंदे, पार्थ अवताडे, स्वप्नील कांबळे, चैतन्य बाबर यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन तरुणाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांमध्ये लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं पोलिस तपासातून समोर आलं खरं मात्र एक प्रश्नाचे उत्तर हे आरोपी देऊ शकलेले नाहीत. गोळीबार झाला पण या ५ जणांपैकी कोणी केला याबद्दल "आपण एक ही गोळी चालवली नाही" असा जबाब चौकशी अंती या आरोपींनी दिला. या प्रकरणात आणखी दोन जणं फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सोलापूरच्या "त्या" शिक्षण संस्थेतील वाद हे होते खरे कारण?

राणा सूर्यवंशी यांच्यावरील "कथित" हल्ल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळयातील नवनाथ झोळ यांची पोलिसांनी चौकशी केली. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांचे नवनाथ झोळ हे बंधू आहेत मात्र रामदास झोळ हे भोंदू मनोहर भोसले प्रकरणात आरोपी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ वर्षांपूर्वी राणा सूर्यवंशी हे दत्तकला शिक्षण संस्थेवर उपाध्यक्ष होते मात्र संपूर्ण संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न राणा करत असल्यामुळे संचालक बोर्डाने राणा यांना पदावरून पायउतार करण्यास भाग पाडले. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणातील आरोपी ज्ञानदेव शिंदे याचे झोळ कुटुंबियांशी कथित संबंध होते. तसेच राणा सूर्यवंशी हा संस्थेत असताना शिंदे त्यांच्यासाठी काम करत होता अशी प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, झोळ कुटुंबियातील कुठल्या ही सदस्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी झालेला वाद आणि त्यातून झोळ कुटुंबीयांवर आरोप करून त्यांनाच या प्रकरणात अडकवायचे असे मनसुबे होते का याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com