Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Raj Thackeray on Marathi identity and political struggle : महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी खचून न जाता लढा सुरूच राहील, असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Raj Thackeray Saam Tv
Published On

Raj Thackeray statement after MNS defeat in municipal elections : महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला अपयश आले. राज्यात फक्त १३ उमेदवार निवडून आले. मुंबईतही मनसेलाही अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे राज ठाकरेंनी निराशा व्यक्त केली. मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया निकालावर राज ठाकरे यांनी दिली आहे. त्याशिवाय जे निवडून आलेत ते सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी महापालिकेची लढाई होती. यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असल्याचे सांगत राज ठाकरेंनी धीर दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Municipal Election results : महापालिका निकालानंतर राडा अन् दगडफेक; भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले...

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !

आपला नम्र

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
ठाकरेंची मुंबईत सत्ता गेली अन् काहीवेळातच शिवसैनिकाला हार्ट अटॅक, बाळासाहेबांच्या पहिल्या महिला आमदाराचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com