Raj Thackeray : ...तर हे लोक संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील; आमदारांच्या उड्यांवरून राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray on Narhari Zirwal Adiwasi MLA Protest : आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावरील उड्यांवरून राज ठाकरेंनी टीका केली केली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत टीका केली आहे.
 ...तर हे लोक संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील; आमदारांच्या उड्यांवरून राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Saam tv
Published On

मुंबई : मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर नरहरी झिरवाळ आणि आदिवसांनी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या. आदिवासी आमदारांनी संरक्षक जाळ्यावर उडी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आमदारांनी उड्या मारल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढलं. पेसा भरती आणि धनगरांना आदिवासीतून आरक्षण नको, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नव्हती. त्यानंतर आज या आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या. यावरून या आमदारांवर राज ठाकरेंनी 'एक्स'वर पोस्ट करत टीका केली.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी, आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ?

हे आमदार सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?

सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही. तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?

आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.

 ...तर हे लोक संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील; आमदारांच्या उड्यांवरून राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray: राज ठाकरे आणि सलमान खानमध्ये झाली भेट; नेमकं कारण काय?
 ...तर हे लोक संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील; आमदारांच्या उड्यांवरून राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray : पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मनसे आक्रमक, राज ठाकरेंनी थेट इशाराच दिला

महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवलीये. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे.

आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आलीये. मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की, यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या.

तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे.

या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत, तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com