VIDEO : 'त्यांना फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंगसाठी वेळ'; विरोधी पक्षाकडून सरकारवर टीकेची झोड

Aadivasi Andolan Update : मंत्रालयात आदिवासी आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे.

आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असा आरोप किरण लहामटे यांनी केला आहे. दरम्यान, आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्यानंतर आता विरोधी पक्षाकडून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी, 'सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल हे आता स्पष्ट आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणि सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला ज्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा दिला, आज त्यांच्यासाठी दोघांकडे वेळ नाही. वेळ आहे तो फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंग, कंत्राटदार आणि घोटाळेबाजांसाठी, असे त्यांनी म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com