Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?

Raigad Traffic Rules For New Year News : रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी गर्दी वाढली. प्रशासनाने 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 दरम्यान मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख राज्यमार्गांवर जड-अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे.
Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?
Raigad Traffic Rules For New YearSaam Tv
Published On
Summary
  • ३१ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान रायगडमध्ये जड-अवजड वाहनांना बंदी

  • मुंबई–गोवा महामार्गासह प्रमुख राज्यमार्गांवर निर्बंध लागू

  • जीवनावश्यक सेवा वाहनांना बंदीतून सूट

  • कोंडीमुक्त, सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

राज्यात शाळा, कॉलेज तसेच ऑफिसला २५ डिसेंबर पासून सलग मिळालेल्या सुट्टीमुळे नागरिकांनी वेगवगळ्या ठिकाणी फिरण्याचा पर्याय निवडला आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला पर्यटकांनी पर्यटनस्थळं खुलले आहे. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

रायगड हा पर्यटन जिल्हा असून मांडवा, अलिबाग, किहीम, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माथेरान आणि रायगड किल्ला यांसारख्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात स्वतःची वाहने घेऊन येतात. वडखळ ते अलिबाग आणि मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक रस्ते अरुंद असल्याने या काळात प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी आणि रुग्णवाहिका तसेच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू नसणार आहेत. त्यामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस (LPG) वाहून नेणारी वाहने. भाजीपाला, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने. पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची वाहने.

Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?
Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ व ११६ अन्वये प्राप्त अधिकारानुसार हे आदेश दिले आहेत. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून ते ०१ जानेवारी २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत असेल ही वाहतूक बंदी असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?
Uddhav Thackeray : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी, सचिन शिवेकरांचा अपक्ष अर्ज दाखल

'या' प्रमुख महामार्ग आणि राज्यमार्गांवर ही बंदी लागू राहील

१. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH 66): खारपाडा ते कशेडी विभाग.

२. दिघी राष्ट्रीय महामार्ग (NH 753 फ): माणगाव-ताम्हाणी घाटमार्गे.

३. महामार्ग क्रमांक ५८४ (अ): कर्जत-पळसदरी मार्गे खोपोली-पालीफाटा ते वाकण.

४. राष्ट्रीय महामार्ग १६६ (अ): वडखळ ते अलिबाग.

५. चौकफाटा ते कर्जत राज्यमार्ग.

६. अलिबाग ते मुरुड राज्यमार्ग.

७. अलिबाग ते मांडवा राज्यमार्ग.

Raigad : नववर्षाच्या स्वागताला कोकणात पर्यटकांची गर्दी! 'या' प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठा बदल; वाचा, कसे असेल नियोजन?
Pune : वाहतुकीत मोठा बदल! लोणावळा-खंडाळ्यात फिरायला जाताय? त्याआधी ही बातमी वाचाच

अवजड वाहतुकीमुळे बऱ्याचदा सर्व सामान्य वाहनांना, पर्यटक व प्रवासी यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच अपघातांचा धोका देखील होतो. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे स्वागत यामुळे मागील अनेक दिवसांपासून मुंबई गोवा महामार्ग व इतर मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र आता अवजड वाहतूक बंद केल्यास वाहतूक काही सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com