R Madhavan FTII President: अभिनेता आर माधवन FTII चे नवे अध्यक्ष, अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून दिली माहिती

R Madhavan News: अभिनेता आर माधवन FTII चे नवे अध्यक्ष, अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून दिली माहिती
R Madhavan FTII President
R Madhavan FTII PresidentSaam Tv
Published On: 

R Madhavan FTII President:

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

अनुराग ठाकूर यांनी लिहिले आहे की, “FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि उच्च स्तरावर नेईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत."

R Madhavan FTII President
Sharad Pawar News: महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही; जालन्यातील घटनेवरून शरद पवारांची शिंदे सरकारवर टीका

आर माधवन यांनी अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. माधवनने सोशल मीडिया X वर लिहिले, “अनुराग ठाकूर जी आदर आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. आर माधवन यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ही जबाबदारी शेखर कपूर पार पाडत होते. मार्च महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला होता. (Latest Marathi News)

अलीकडेच आर माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हा 2022 चा भारतीय चरित्रात्मक चित्रपट आहे. याचं लेखन, निर्मित आणि दिग्दर्शित आर माधवन यांनी केलं आहे.

R Madhavan FTII President
Maratha Aarakshan: 'इतका मोठा लाठीमार गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही', राऊतांनी व्यक्त केला वेगळाच संशय..

हा चित्रपट नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्याची भूमिका माधवन यांनी साकारली आहे. 'रॉकेटरी' जगभरात हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com