Zilla Parishad Election: धुरळा उडाला! पुणे जिल्हा परिषदेवर 'महिला राज'; ५० टक्के जागा राखीव

Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीत महिला राज राहणार आहे. एकूण ७३ जागांपैकी ५०टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Pune Zilla Parishad Election
Women’s leadership on the rise! Pune Zilla Parishad allocates 50% of seats to women ahead of elections.saam tv
Published On
Summary
  • पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांची सोडत जाहीर करण्यात आली.

  • यंदा ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

  • जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली असून प्रक्रिया पारदर्शकपणे झाली.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग आला आहे. आज पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेची सोडत काढण्यात आलीय. गेल्या वेळेस पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ जागा होत्या आता ७३ जागा आहेत. नव्याने पुणे महापालिका समाविष्ट झालेल्या गावामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या दोनने कमी झाली आहे.

Pune Zilla Parishad Election
कोल्हापुरात निवडणुकीचं बिगुल वाजलं! जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यात ७३ जागांसाठी ही जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे.

Pune Zilla Parishad Election
Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

येथील ७३ जागांमध्ये ३७ महिला जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत. अनुसूचित जातीमध्ये ७ जागा आहेत. यामध्ये ४ महिला सदस्य असणार आहेत. अनुसूचित जमातीमध्ये ५ जागा आहेत यामध्ये ३ महिला सदस्य असणार आहेत. नागरिकांचा समावेश मागासवर्ग प्रवर्गात १९ जागा असून यात १० महिला सदस्य असणार आहेत. सर्वसाधारण ४२ जागा आहेत, यामध्ये २० महिला जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडणुका पार पडणार आहे.

Pune Zilla Parishad Election
Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

गेल्या अनेक वर्ष पुणे जिल्हा परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता राहिलेले आहे, मात्र यावेळेस अनेक राजकीय गणित बदलल्याने जिल्हा परिषदेमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष आहे. यावेळेस जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट दोन शिवसेना आणि मनसे अशी निवडणूक होईल. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com