Pune: लग्नानंतर नवरा नपुंसक असल्याचं कळलं; नववधुला सासऱ्याकडून धमकी, कुणाला सांगितलं तर...

Shocking Case in Pune: पुण्यात तरुणीने लग्नानंतर पती नपुंसक असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार दाखल केली. सहा जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Shocking Case in Pune
Shocking Case in PuneAI
Published On

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नानंतर पती नपुंसक असल्याचं समोर आलं. त्यानंतर सासरच्यांकडून छळ सुरू झाला. याच त्रासाला कंटाळून विवाहितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सासरच्या मंडळींना आधीपासूनच मुलगा नपुंसक असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहितेचे वय २३ आहे. तिचं १८ एप्रिल २०२५ रोजी तरूणाशी विवाह झाला. लग्न झाल्याच्या काही दिवसानंतर पती नपुंसक असल्याची माहिती तरूणीला मिळाली. तिच्या पायाची वाळू सरकली. तिनं याबाबत पती आणि सासरच्या मंडळींना काही प्रश्न विचारले, जाब विचारला. मात्र, तिला बदल्यात धमकी देण्यात आली. 'कुणाला सांगितले तर याचे गंभीर परिणाम होतील', अशी धमकी देण्यात आली, असं तरूणीनं सांगितले.

Shocking Case in Pune
'या' जिल्ह्यात AIDSचा विस्फोट! आतापर्यंत ७,४०० रूग्ण आढळले, HIV पॉझिटिव्ह रूग्णाशी लग्न करावे का?

नंतर सासरच्या मंडळींनी तरूणीचे इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा खोटा आरोप केला. तसेच विवाहित महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असं विवाहितेनं तक्रारीत नमूद केलं आहे. यासह मानसिक छळ देखील केला जात होता, असं पीडितेनं म्हटलंय. याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणी विवाहितेनं समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. समर्थ पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shocking Case in Pune
रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com