Pune : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली ! खडकवासला धरण १०० टक्के भरलं; इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा?

Pune News : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये ८२.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे.
PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEFSaam Tv
Published On
Summary
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

  • पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये ८२.८६ टक्के पाणीसाठा

  • खडकवासला धरण १०० टक्के भरले

  • गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! राज्यात यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या धरणसाठ्याने मागील वर्षाच्या याच दिवसातील सरासरीलाही मागे टाकले आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये एकूण ८२.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा ८२.२७ टक्के होता. म्हणजेच, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १ टीएमसीने जास्त पाणी धरणांमध्ये उपलब्ध झाले आहे.

PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

चारही धरणांपैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. तसेच पानशेत धरणात ८७.३२ टक्के, वरसगाव धरणात ८१.८६ टक्के, तर टेमघर धरणात ६५.२४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे.

PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

त्यामुळे एकूण पाणीसाठा २४.१५ टीएमसी इतका झाला असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो २३.९८ टीएमसी होता. या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com