
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्येची घटना घडलीय. हिंजवडी पार्कमध्ये एका अभियंत्याने ७ व्या मजल्यावरून उडी मारू आत्महत्या केली होती. त्यानंतर आता खडकवासला धरणात उडी मारून एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केलीय. ही घटना संध्याकाळी घडली.
आत्महत्या करणाऱ्या तृतीयपंथीयाचे नाव निलेश सोनाली खंडागळे वय २३ असे आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी मृत घोषित केले आहे. निलेश सोनाली खंडागळे या तृतीयपंथीनं आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. दरम्यान नांदेड सिटी पोलिसाकडून तपास केला जात आहे
हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या पियुष अशोक कावडेनं ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पियुषने टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही पडलाय. पोलिसांना त्याच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आलीय. त्यात त्याने आई-वडीलांची माफी मागितली आहे. मी सर्व ठिकाणी अपयशी ठरलोय. तुमचा चांगला होण्याचा पात्र नाही. जास्त चौकशी करू नका अशा आशयाची नोट त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली होती.
साडेदहा वाजण्याच्या सुमारात पियुष हा कंपनीत आपल्या सहकाऱ्यासोबत मीटिंगमध्ये बसला होता. त्यावेळी त्याने छातीत त्रास होत असल्याचं सांगत मिटिंग अर्ध्यात सोडली आणि सातव्या मजल्यावर गेला. तेथून त्याने उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान पियुष कोणत्या तणावात होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.