Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या
Pune Crime Saam Tv

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Pune Police: पुण्यामध्ये तरुणाने आपल्या छोट्या भावाची हत्या केली. ताम्हिणी घाटात नेऊन त्याने भावाला संपवलं आणि तिथेच मृतदेह फेकून पळ काढला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Published on

Summary -

  • पुण्यात ताम्हिणी घाटात मोठ्या भावाने लहान भावाची धारदार शस्त्राने केली हत्या

  • दारूच्या व्यसनामुळे वाद होऊन ही हत्या झाल्याचे पोलिस तपासातून उघड

  • मृतदेह घाटात फेकून आरोपी पळून गेला पण पोलिसांनी केली अटक

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हणी घाटात नेऊन तरुणाने भावाला संपवलं. धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. भावाला दारूचे व्यसन होते यामुळे त्रस्त होत त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. पुण्यातील कर्वेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ३ दिवसांपूर्वी दोघे भाऊ एकाच दुचाकीवरून ताम्हिणी घाटाच्या दिशेने गेले होते. त्यावेळी वाटेत त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. यावरून संतप्त झालेल्या अनिकेत शिर्केने छोटा भाऊ ऋषिकेश शिर्केवर धारधार शस्त्राने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

त्यानंतर अनिकेतने ऋषिकेशचा मृतदेह ताम्हिणी घाटात गोनवडी येथे फेकला आणि पळून गेला. ताम्हिणी घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे कळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असताना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस तपासातून भावानेच भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली. त्याआधारे कर्वेनगर आणि वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा एकत्र तपास केला.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या
Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

त्यानंतर पोलिसांनी कर्वेनगर भागातून अनिकेतला अटक केली. ऋषिकेश हा सतत दारू आणि नशा करायचा. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ अनिकेत खूपच वैतागला होता. अखेर अनिकेतने या त्रासातून मुक्त होण्यासाठी भावाची हत्या केली. त्याने पोलिसांनी हत्येची कबुली दिली. सध्या या गुन्ह्याचा तपास पौड पोलिसांनी सुरू केला आहे. पौंड पोलिसांकडे आरोपीला देण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या
Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com