Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

Raigad News : जांभुळपाडा पोलिस ठाणा हद्दीतील हातोंड, गोंदव आणि माठळ या गावांमध्ये दरोड्याच्या घटना घडल्या. गावांमधील पाच घरांमध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करत घरातील सदस्यांना हत्याराचा धाक दाखवून लूटमार
Pali Crime News
Pali Crime NewsSaam tv
Published On

Summery

-  कोयत्यांचा धाक दाखवून पाच ठिकाणी टाकला दरोडा
-  साधारण ८० हजार रूपयांचा ऐवज लंपास
-  घटना स्थळी दोन कोयते लागले पोलिसांच्या हाती



सचिन कदम 
रायगड
: रात्रीच्या अंधारात दरोडेखोरांकडून धुमाकूळ घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात घडली आहे. याठिकाणी चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. कोयत्यांचा वापर करीत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकण्यात आला आहे. यात साधारण ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पाली पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याची हि घटना समोर आली आहे. हातात हत्यात घेऊन चार ते पाच जणांनी अक्षरशः परिसरात धुमाकूळ घातला आहे. जांभुळपाडा पोलिस ठाणा हद्दीतील हातोंड, गोंदव आणि माठळ या गावांमध्ये दरोड्याच्या या घटना घडल्या आहेत. या गावांमधील पाच घरांमध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करत घरातील सदस्यांना हत्याराचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. 

Pali Crime News
Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

तीन घरातून ऐवज लांबविला 

दरम्यान या दरोडेखोरांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकला आहे. या पैकी दोन ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र तीन घरांमधून त्यांनी साधारण ८० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ज्या मध्ये सोन्याचे मंगळसुत्र, कानातले झुमके, रोख रक्कम आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. हा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधारात पसार झाले आहेत. 

Pali Crime News
Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

पोलिसात तक्रार दाखल 

घडल्या प्रकरणानंतर कुटुंबीय भयभीत झाले होते. यानंतर पोलिसांना माहिती देत या प्रकरणी जांभुळपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता घटनास्थळी दोन कोयते पोलिसांच्या हाती लागले आहेत. सशस्त्र दरोड्याच्या या घटनांमुळे सुधागड पाली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com