Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Police: पुणे शहरातील वाहतुकीमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट भुयारी मार्ग दुरूस्तीच्या कामासाठी १९ ते २२ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जारी केले आहेत.
Published on

Summary -

  • स्वारगेट भुयारी मार्ग १९ ते २२ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.

  • वाहतूक विभागाने पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन केले.

  • पुणेकरांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन.

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. स्वारगेट येथील भुयारी मार्ग दुरुस्ती कामासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीमध्ये दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी पर्याय मार्ग जारी केले आहेत. पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत स्वारगेटमधील कै. केशवराव जेधे चौक येथील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या दुरूस्तीचे काम १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कालावधीत वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक विभाग पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी दिली ही माहिती दिली.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

या कालावधीत केशवराव जेधे चौक स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे जाणारा रस्ता (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग सुरु होताना डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जाऊन तेथून सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com