वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची नावे द्या आणि बक्षिसं जिंका, पोलिसांची अनोखी योजना

Pune Traffic Police Promote Citizen Participation: पुणे शहरातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी योजना सुरू केली आहे. नागरिकांनी नियमभंगाचे फोटो अपलोड केल्यास रोख बक्षीस मिळणार आहे.
Pune Traffic Police promote citizen participation to curb traffic violations through a reward-based mobile app initiative.
Pune Traffic Police promote citizen participation to curb traffic violations through a reward-based mobile app initiative.Saam Tv
Published On

पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा चर्चेचा विषय आहे आणि त्यातच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. कुठे सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, नो एन्ट्री, रॅश ड्रायव्हिंग अशा अनेक गोष्टी पुणेकरांकडून सर्रास करताना पाहायला मिळतायत. आता अशाच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आळा घालण्यासाठी तसेच शिस्त लागावी म्हणून पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक अनोखी योजना आणली आहे. जे नागरिक 'पुणे ट्रॅफिक पोलीस' ॲपवर वर्षभरात सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंदवतील, त्यांना थेट 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. पुणे पोलिसांच्या पी टी पी या मोबाईल ऍप्लिकेशन वरुन नागरिकांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. पुढील ६ महिन्यांसाठी सुरू राहणारी योजना नेमकी आहे.

पुणे शहरात सध्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. कोणी सिग्नल तोडत आहे तर कोणी विना कागदपत्र गाडी चालवत आहेत तर कोणी थेट दारू पिऊन वाहन चालवत आहेत. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अनेकवेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होते मात्र चालक दंड भरून पळ वाट काढतात. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी एक शक्कल लढवत पुणेकरांच्या फायद्याची एक अनोखी योजना राबवायला सुरुवात केली आहे.

वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे फोटो तुम्ही जर काढले आणि ते वाहतूक शाखेच्या पी टी पी (पुणे ट्रॅफिक पोलिस) अँप यावर अपलोड करायचे. महिन्यातील सर्वाधिक तक्रारी दाखल करणाऱ्या यूजरला पुणे पोलिसांकडून दर महिन्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं जाणार आहे.

पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपआयुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिक आपल्या मोबाईलवरून विविध नियमांच्या उल्लंघनाचे फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकतात. या ऍप मध्ये १३ प्रकाराचे उल्लंघनाचा समावेश करण्यात आला आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, फुटपाथवर वाहन उभे करणे, फॅन्सी नंबर प्लेट, रॅश ड्रायव्हिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर यासारखे अनेक प्रकार या यादीत आहेत."

"प्रत्येक अपलोड झालेल्या फोटो आणि व्हिडिओची बारकाईने तपासणी केली जाते, जेणेकरून कोणावरही चुकीची कारवाई होऊ नये तसेच ज्या युजर ने ही माहिती दिली आहे त्याचं नाव सुद्धा गोपनीय ठेवलं जातं. या योजनेला आता २ महिने होतील. डिसेंबर महिन्याचे बक्षिस आम्ही नुकतेच दिले. ५० हजाराचे पहिले बक्षीस असून द्वितीय बक्षीस २५ हजार रुपयांचे आहे आणि तिसरे बक्षीस १५ हजारांचे असणार आहे. जानेवारी महिन्यातील विजेत्यांची नावे पुढील २ ते ३ दिवसात जाहीर होतील," असं ही पोलिस उपआयुक्त म्हणाले.

पुढील ३ दिवस पुण्यात ट्रिपल सीट कारवाई

पुण्यात आजपासून पुढील ३ दिवस शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात वाहतूक पोलिसांकडून ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. २ दिवसांपूर्वी अशाच कारवाई मधून पुणे पोलिसांनी १६ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. "ट्रिपल सीट वाहन चालवणे हा गुन्हा आहे. किशोरवयीन मुलांकडून पुण्यात अनेक ठिकाणी ट्रिपल सीट वाहनं चालवले जणं आढळून आले आहे. त्यामुळे आता अशा नियमबाह्य वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन हे दोन्ही जप्त केले जातील," अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com