Shocking: खेड शिवापूर टोल नाक्यावर ऑन ड्युटी असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला

Traffic Police Havaldar Beaten : पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहतूक पोलिसावर हल्ला झाला आहे. यात हवालदार जखमी झाले असून, त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Traffic Police Havaldar Beaten
saam tv
Published On
Summary
  • पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांवर हल्ला झाला.

  • पोलीस हवालदार प्रशांत राऊत हे या हल्ल्यात जखमी झाले.

  • जखमी प्रशांत राऊत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे - सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हल्ला झाला आहे. प्रशांत राऊत असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्रशांत राऊत हे राजगड पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत हवालदार पदावर कार्यरत आहेत. दरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर झालेल्या हल्ल्यात प्रशांत राऊत जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Traffic Police Havaldar Beaten
Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ४ परदेशी तरुणींनी नको त्या अवस्थेत पकडलं

या हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर हवालदार प्रशांत राऊत कर्तव्य बजावत होते, त्यावेळी काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला करण्यात आला. नया हल्ल्यात त्यांना दुखापत झाली.घटनेनंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Traffic Police Havaldar Beaten
Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस ठाणे करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com