Pune: बायको गावाकडे, मुलं शाळेत; वाहतूक पोलिसाने राहत्या घरी संपवलं आयुष्य, पुण्यात खळबळ

Pune Traffic Police Ends Life: पुण्यात वाहतूक पोलीस राजेंद्र गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Traffic Police Ends life at home
Pune Traffic Police Ends life at homeSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही प्रतिनिधी

पुण्यातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेच्या दिवशी मुलं शाळेत गेले होते. तर, पत्नी दौंडला गेल्या होत्या. मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांनी दार ठोठावला. मात्र, कुणीच दार उघडले नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड हे सध्या पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. त्यांची पत्नी दौंड येथे गेल्या होत्या, तर १२ आणि १४ वर्षांचे मुलगा व मुलगी शाळेत गेले होते.

Pune Traffic Police Ends life at home
स्कूल व्हॅन चालकाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; प्रायव्हेट पार्टला इजा अन् मारहाण, परिसरात खळबळ

सकाळपासून गायकवाड यांच्या पत्नीला त्यांनी वारंवार फोन केला. मात्र, त्यांनी कॉलला काही प्रतिसाद दिला नाही. दुपारी मुलं शाळेतून परत आल्यावर घर बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार दार ठोठावले. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले.

Pune Traffic Police Ends life at home
Maharashtra Politics: अजित पवारांच्या नेत्याला मंत्रिमंडळातून डच्चू? अमित शाहांचे नाव घेत ठाकरेंच्या खासदाराकडून दावा

तेव्हा समोर गायकवाड गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याची माहिती त्यांच्या पत्नीला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने घराजवळ धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Traffic Police Ends life at home
Politics: भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, पक्षात जाऊन आमदार-मंत्री व्हायचं, ठाकरेंच्या खासदाराची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com