Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते बुधवारी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Big Traffic Changes in Pune on Wednesday: पुण्यातील वाहतूक मार्गात बुधवारी मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक प्रमुख रस्ते बुधवारी बंद राहणार आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते बुधवारी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Big Traffic Changes in Pune on WednesdaySaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात बुधवारी प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत

  • बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६ सायकल स्पर्धेमुळे वाहतुकीत बदल

  • सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार

  • नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतुकीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील मुख्य रस्ते बुधवारी बंद राहणार आहेत. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत सायकल स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या सायकल स्पर्धेमुळे पुण्यात उद्या रस्ते बंद राहणार आहेत. तर या स्पर्धेमुळे शहरातील अनेक सरकारी आणि खासगी शाळांना देखील बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील प्रमुख रस्ते उद्या सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पुण्यातील कॅम्प, एम जी रोड, गोळीबार मैदान, खडी मशीन, बोपदेव घाट, नांदेड सिटी रोड चौकातील रस्ते सकाळपासून बंद राहणार आहेत. ब्ल्यु नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते खाण्या मारुती चौक (एम.जी रोड) ते सोलापूर बाजार चौकी चौक (नेपियर रोड) ते गोळाबार मैदान रस्ता हे रस्ते देखील बंद राहणार आहेत.

Pune Traffic
Pune Traffic

गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक ते ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप रस्ता, शितल पेट्रोल पंप ते खडी मशिन चौक हे रस्ते बंद राहणार आहेत. खडी मशिन चौक ते ट्रिनिटी कॉलेज ते बोपदेव घाट, खडकवासला ते किरकीटवाडी, किरकीटवाडी ते नांदेड सिटी हे सुद्धा रस्ते बंद राहणार आहे. हे रस्ते बंद राहणार असल्यामुळे पुणेकरांनी पर्याय रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune Traffic
Pune Traffic

‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० वाजता लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरू होणार असून नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे. या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली तालुक्यातून ही रेस जाणार आहे. ही स्पर्धा १०९.१५ किलोमीटर आहे. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते बुधवारी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

ही स्पर्धा लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरू होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते बुधवारी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com