6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

पुण्यात विषारी दारूनं तब्बल 22 जणांचा जीव घेतलाय....मात्र अवघ्या 6 हजार 600 रुपयांसाठी आरोपी योगेश वानखेडेनं विषारी दारू कशी तयार केली? दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Toxic liquor tragedy in Pune claims 22 lives after methanol-laced alcohol was distributed across multiple locations.
Toxic liquor tragedy in Pune claims 22 lives after methanol-laced alcohol was distributed across multiple locations.saam tv
Published On

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूनं 22 जणांचा बळी घेतलाय...उरळी कांचनमधील राजू प्रजापतीकडून दारू खरेदी करून आरोपी वानखेडे ती वेगवेगळ्या गुत्त्यांवर विकायचा. पण दारूचे प्रमाण दुप्पट करून जास्त पैसे कमवण्यासाठी वानखेडेनं त्यात थेट मिथेनॉल मिसळले आणि ही दारू जीवघेणी बनली. त्यामुळे अवघ्या 6 हजार 600 रुपयांच्या किरकोळ फायद्यासाठी आरोपी योगेश वानखेडेनं डेथ प्लॅन कसा रचला पाहूयात......

29 एप्रिल 2026

बनावट आधारकार्डच्या मदतीनं वानखेडेनं 215 लीटर मिथेनॉल मागवलं

215 लीटर मिथेनॉलसाठी वानखेडेनं 17500 रुपये मोजले

9 मे 2026

35 लीटरचे 5 ड्रम दारू 9 हजार 500 रुपयांना विकत घेतले

23 मे 2026

आरोपी राजू प्रजापतीच्या उरळी कांचनमधील देशी हातभट्टीवर दारू बनवण्यासाठी तयारी सुरु केली

5 ड्रम दारूमध्ये 5 ड्रम पाणी मिसळून 10 ड्रम केलं

निम्म्याहून अधिक मिथेनॉल टाकून 12 ड्रम तयार केले

मिथेनॉलसाठी 17 हजार 500 आणि दारूसाठी 9 हजार 500 असा एकूण 27 हजार रुपये खर्च वानखेडेला आला...

वानखेडेनं 2 हजार 800 रुपये प्रमाणे मिथेनॉल मिश्रित दारू तीन ठिकाणी विकली..त्यामुळे 12 ड्रम मिथेनॉल मिश्रित दारूचे वानखेडेला 33 हजार 600 रुपये मिळाले... म्हणजे मिथेनॉल मिसळून वानखेडेला अवघ्या 6 हजार 600 रुपयांचा फायदा झाला...

दरम्यान मिथेनॉल मिश्रित दारू किती कॅन वानखेडेनं कोणा कोणाला विकले पाहूयात... वानखेडेनं मिथेनॉल मिश्रित दारूचे 5 कॅन फुगेवाडीतील गुरमीतसिंग विरखाला विकले... 6 कॅन हडपसरच्या आकाश जाधवला विक्रीसाठी दिले.. तर एक कॅन दारू वानखेडेनं दापोडीतील इरफान उर्फ पप्पू कुरेशीला दिला..ज्यामुळे 22 जणांचा मृत्यू झालाय...

थोड्याशा फायद्यासाठी अनेक निष्पापांचे बळी घेणाऱ्या वानखेडेला पोलिसांनी अटक केलीय... मात्र वानखेडेनं ज्या बनावट आधारकार्डच्या आधारे कंपनीकडून मिथेनॉल मागवले... ते आधारकार्ड तयार करणारा, विषारी दारूची विक्री करणारे आणि आरोपीला सहकार्य करण्यांवर लवकरच कडक कारवाई व्हायला हवी. काहि वर्षांपासून पुण्यातील कायदा व सुव्यवस्था ही चिंतेची बाब झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूची विक्री राजरोसपणे सुरु असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं ? हातभट्ट्यांना आणि दारूच्या गुत्त्यांना नेमका कोणाचा अभय होता? हे सुद्धा तपासात समोर यायलाच हवं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com