

पुण्यातील वाघोलीत घडला हत्येच थरार
आरोपीने केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या
हत्येच्या घटनेने वाघोली परिसरात खळबळ
पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने पार्टनरची हत्या केली. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. घरात असलेल्या तरुणीचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घरातून दुर्गंधी सुटली. हा संपूर्ण प्रकार १ जून रोजी प्रकार उघडकीस आलाय.
रिहाता खातून असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मूळची पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे. रिहाना हत्या प्रकरणी इम्रान राजेसाब बोदले खान यांनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीनंतर वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रवी समीर वैराळ असे आरोपीचे नाव आहे.
मृत रिहाना खातून आणि आरोपी रवी वैराळ हे दोघे वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात एकत्र राहत होते. मागील अनेक महिन्यांपासून आरोपी रवी हा रिहानावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. जोडप्यामध्ये २८ मे रोजी कडाक्याचे भांडण झालं.
रागाच्या भरात रवीने रिहानाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत रिहानाचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याने आरोपी रवी घाबरला. त्याने मृतदेह घरात ठेवून तातडीने घराला बाहेरून कुलूप ठोकून पसार झाला. घरात असलेल्या मृतदेहाचा दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना संशय येऊ लागला. या घटनेची तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडलं. त्यावेळी पोलिसांना घरात रिहानाचा मृतदेह आढळून आला.
या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त नूतन पवार आणि वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.