Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

pune drishyam style killing case : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार समोर आला आहे. थंड डोक्याने नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
pune crime
pune drishyam style killing case Saam tv
Published On
Summary

पुण्यातील वारजेमध्ये दृश्यम स्टाइल हत्याकांड

बिझनेसमनने केली बायकोची निर्घृण हत्या

हत्याकांडातील महत्वाचा पुरावा हाती लागला

हत्याकांडाचा पहिला सीसीटीव्ही समोर

पुण्यातील वारजेमध्ये दृश्यम स्टाइल हत्याकांड घडलं आहे. पुण्यात एका बिझनेसमनने बायकोची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यात बिझनेसमनने बायकोला संपवलं. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करून बायको हरवल्याची तक्रार पोलिसांत केली होती. या हत्याकांडाचा पहिला सीसीटीव्ही समोर आला आहे.

पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. या जोडप्याचा भेळ खाण्यासाठी गेलेल्या ठिकाणाचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी पती त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचे समोर आलं आहे. भेळ खात असताना पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला.

pune crime
मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

हत्या केल्यानंतर स्वतः पतीने पुरावे नष्ट करून पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली होती. वारजे पोलिसांनी तपासात थरकाप उडवणारा हा गुन्हा उघडकीस आणला आहे. समीर पंजाबराव जाधव असे या आरोपीचे नाव आहे. तर अंजली समीर जाधव (वय ३८) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

pune crime
शिक्षकांवर अन्याय, TET परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करा; गुरुजींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

काय आहे प्रकरण?

पत्नीचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय नवऱ्याला आला. तिच्या मोबाईलवरील चॅट्स पाहिल्यानंतर अनेकदा वाद झाले. ती सुधारणार नाही हे लक्षात आल्याने तिचा काटा काढायचे ठरवले. त्यासाठी त्याने शिंदेवाडी येथे १८ हजार रुपये भाड्याने एक गोदाम घेतले. लोखंडी बॉक्स तयार करून तिथे ठेवला आणि लाकडाची पोती आणून ठेवल्यानंतर हत्येची तयारी केली.

pune crime
कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

आरोपीने २६ ऑक्टोबर रोजी अंजलीला कारने फिरायला नेले. नवले ब्रिजमार्गे खेडशिवापूर, मरीआई घाट परिसरात फिरवल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदेवाडी येथे थांबून भेळ खाण्याचा बहाणा केला. गोदामात चटईवर बसून दोघे भेळ खात असताना अचानक तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळला. राख नदीपात्रात टाकली आणि बॉक्स भंगारात विकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com