Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

PSI Topper Ashwini Kedari Passes Away: पुण्याच्या पोलिस उपनिरिक्षक अश्विनी केदारी यांचा मृत्यू झाला आहे. गरम पाणी अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यातच त्यांचा जीव गेला आहे.
Ashwinin Kedari
Ashwinin KedariSAAM TV
Published On

स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर काम करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. यासाठी दिवसरात्र एक करुन मेहनत करतात. दिवसातील १२-१२ तास अभ्यास करतात. अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अचानक काळाने घाला घालावा अन् अचानक संपूर्ण आयुष्यच बदलून जावं. असंच काहीसं अश्विनी बाबुराव केदारी यांच्यासोबत झालं.PSI अश्विनी यांचं दुःखद निधन झालं आहे. अवघ्या ३०व्या वर्षी अश्विनी यांची प्राणज्योत मावळली.

Ashwinin Kedari
Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

अश्विनी बाबुराव केदारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. अश्विनी यांना जिल्हाधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी अभ्यासदेखील सुरु केली होता. परंतु अचानक झालेल्या या निधनाने त्यांचे स्वप्न अर्धवट राहिलं. अश्विनी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला खूपच मोठा धक्का बसला होता.

अश्विनी केदारी यांचा अपघात झाला होता. २८ ऑगस्ट रोजी त्या अभ्यासासाठी उठल्या होत्या. त्यांनी अंघोळीला पाणी तापत ठेवले होते. त्या पाणी तापलं आहे की नाही हे बघायला बाथरुममध्ये गेल्या. त्यावेळी अचानक हिटरचा धक्का बसला. यावेळी त्यांच्या अंगावर गरम पाणी सांडलं. यातून त्या ८० टक्के भाजल्या. त्यांना तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला.

Ashwinin Kedari
Success Story: कोणत्याही कोचिंगशिवाय २२व्या वर्षी UPSC क्रॅक; IFS मुस्कान जिंदल यांचा प्रवास

अश्विनी या मूळच्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या रहिवासी. अपघातात भाजल्याने आश्विनीवर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी झुंज देत असताना अखेर अश्विनीने प्राण सोडले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिली येत तिने पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली होती. कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यात मोठ्या पदावर पोहोचेल अशी आशा होती. मात्र एका किरकोळ अपघातात भाजल्याने तिचं आयुष्य काळाच्या पडद्याआड गेलं. कुटुंबीयांनी शर्तीचे प्रयत्न केले, पण मृत्यूशी झुंज देताना तिला अपयश आलं. अनेक स्वप्नं, कर्तृत्व आणि जिद्दीला काळाने हिरावून नेल्याने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Ashwinin Kedari
Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com