पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर त्याचा परीणाम सगळ्याच गोष्टींवर झालाय. महागाईमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलंय. अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्याने लाखो पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड स्कूल बस ओनर्स असोसिएशनने 1 जूनपासून स्कूल बस, व्हॅन, रिक्षाच्या भाड्यात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पालकांवर कसा आर्थिक भार पडणार आहे ते पाहूया.. पालकांवर आर्थिक भार
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूल बसचे भाडे 1 जूनपासून वाढणार
इंधन दरवाढ, वाढीव टॅक्समुळे दरवाढीचा निर्णय
सरासरी 15 ते 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय
काही ठिकाणी 25 टक्के भाडेवाढ
काही भागात प्रति किमी 100 रुपयांपर्यंत भाडेवाढ
दरमहा 5 हजार रुपये बस फी असल्यास
500-550 रुपयांची वाढ होणार
अमरावती जिल्ह्यातही स्कूल बस-व्हॅनच्या मासिक शुल्कात २५ टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय शालेय वाहतूक चालक-मालक संघटनेने घेतला आहे. या दरवाढीवरुन पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने शाळांना एक प्रस्ताव दिलाय. पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी संघटनेने आठवड्यातून '३ दिवस प्रत्यक्ष शाळा आणि २ दिवस ऑनलाईन शिक्षण' अशी 'हायब्रिड' शाळा पद्धतीचा नवा प्रस्ताव मांडला आहे. एकीकडे स्कूल बस महाग झाली असतानाच दुसरीकडे शालेय साहित्य आणि गणवेशाचे दरही वाढल्याने पालकांना मोठी आर्थिक झळ बसतेय. महागाईत सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्यानं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.