Rajgurunagar News: राजगुरुनगरमध्ये हिट अँड रनचा थरार; डॉक्टरने तीन दुचाकींसह दिसेल त्याला चिरडलं

Rajgurunagar Hit And Run Case: राजगुरुनगरमध्ये हिट अँड रनचा थरार झाला आहे. एका डॉक्टरने तीन दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडलं आहे. ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Rajgurunagar News
Rajgurunagar NewsSaam Tv
Published On

राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. भीमाशंकर मार्गावर सातकरस्थळ येथे हिट अँड रनचा थरार झाला आहे. एका डॉक्टरने तीन दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडलं आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने पादचाऱ्यांना चिरडलं आहे. राजगुरुनगरमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत.

Rajgurunagar News
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

कारचा चालक हा मद्यपान करुन कार चालवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सर्वात आधी पादचारी नागरिकांना धडक दिल्यानंतर तीन दुचाकींना कारने धडक दिली आहे. ५ जण हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार अपघातातील चालक दारुच्या नशेतील व्यक्ती डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Rajgurunagar News
Pune News: नशा करण्यासाठी आईचा पैसे देण्यास नकार, पोरानं १३ दुचाकी पेटवल्या, आई म्हणते माझ्या मुलाला...

राजगुरुनगरमध्ये काल रात्री ११ वाजता ही घटना घडली आहे. यावेळी कारचालकाने दुचाकीवरील तिघांना धडक दिली. याचसोबत इतर पादचाऱ्यांनाही धडक दिली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांना याबाबत काहीच माहित नव्हते. तसेच जखमी आणि मोटारचाकाबद्दल आम्हाला काही माहित नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

चासकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या एका कारने दुचाकीस्वारांना धडक दिली आहे. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यानंतरही मोटारचालक थांबले नाही ते तसेच पुढे गेले. यानंतर सातरस्थळ ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोरदेखील या कारने एका दुचाकीला धडक दिली आहे. त्यानंतर लगेचच तीन पादचाऱ्यांना उडवले आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी आहे. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

Rajgurunagar News
Pune News : पुण्यात गैरवर्तन करणाऱ्या गौरवची अहुजाची कार जप्त होणार? वकिलांनी दिली मोठी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com