Pune Dam Water Today: खडकवासला धरणातून विसर्ग बंद; जिल्ह्यातील चार धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा

Pune Weather Update: कालपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने हा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
Pune Dam Water Level Today
Pune Dam Water Level TodaySaam TV
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Rain Update: पुणे शहर आणि जिल्ह्यातील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पुण्यातील खडकवासला धरण आता 91 टक्के भरले. त्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली होती. मात्र कालपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने हा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

Pune Dam Water Level Today
Pune News: पुणेकरांची चिंता वाढली! डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ; अशी घ्या काळजी..

याबाबत अधिक माहिती अशी की, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मंगळवारी संध्याकाळपासून या धरणातून मुठा नदीपात्रात (Mutha River) विसर्ग सुरू झाला होता. अतिरिक्त झालेले पाणी मुठा नदीत सोडले जात होते, मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी होत गेल्याने दुपारी एक वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.

मंगळवारी मुठा नदीत सायंकाळी सात वाजल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी टप्प्याटप्प्याने वाढवले होते. या पाण्याचा मंगळवारी रात्री अकरा ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत ३४२४ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. सध्या पुणे जिल्ह्यातील चारही धरणांमध्ये मिळून 70 टक्के एवढा पाणीसाठा आहे.

Pune Dam Water Level Today
Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार?; आज ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये असणारा पाणीसाठा..

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील प्रमुख पाण्याचा स्त्रोत असलेल्या खडकवासला धरणामध्ये ९६ टक्के, पानशेत धरणात ७३ टक्के, वरसगाव धरणामध्ये ६५ टक्के आणि टेमघर धरणामध्ये ४९ टक्के इतका पाणीसाठा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com