पुणे शहरामध्ये (Pune City) सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहे. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.
पुणे शहरासह उपनगरात सायंकाळी अवकाळी पावासाने जोरदार हजेरी लावली. उंड्री, पिसोळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, हांडेवाडी, वडकी या भागात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ढगांच्या गडगड आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पुण्यातील कर्वेनगर, कोथरूड, शिवाजीनगर या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली आहेत.
पुण्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण जाणवत होते. दुपारी उकाडा वाढला होता. अशामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. अचानक आलेल्या जोरदार पावसाने रस्त्यावरील नागरिकांची धावपळ उडाली.
पावसाचे पाणी पुण्यातील रस्त्यावरून वाहत आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामावरून घराच्या दिशेने जाणाऱ्या पुणेकरांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता यांसह विविध भागात वाहतूक कोंडी झाली होती. सध्यांकाळी सहा ते आठ दरम्यान वाहतूक मंदावली होती. वळवाचा पाऊस वेळेवर झाल्याने यावर्षी आवश्यक पाऊस होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने येत्या ३ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक या ठिकाणी गारपीट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.