Pune Porsche Case: आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात, पैसे फेकले ससूनचे डॉक्टरही मॅनेज झाले; बिल्डरच्या पोरासाठी भ्रष्ट यंत्रणा सरसावल्या

Pune Sassoon Hospital: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी चक्क ब्लडचं सॅम्पलच बदलण्यात आलं.
आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात, पैसे फेकले ससूनचे डॉक्टरही मॅनेज झाले; बिल्डरच्या पोरासाठी भ्रष्ट यंत्रणा सरसावल्या
Pune Sassoon HospitalSaam Tv

गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील ड्रंक अँ ड्राईव्ह प्रकरणात तपासाची पाळंमुळं खोलवर जातायत तसे नवनवीन ट्विस्ट येतायत. बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पैशांच्या जोरावर भ्रष्ट शासकीय यंत्रणां कशा कामाला लागल्या होत्या, याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अपघाताच्या वेळी पोर्श चालणाऱ्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या ब्लड रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी रक्ताचे नमुनेच बदलल्याचा कारनामा केलाय.

ससून रुग्णालयात नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार,19 मे रोजी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होतं. मुलाचे ब्लड सॅम्पल डॉ. श्रीहरी हळनोर याच्या विभागानं घेतले. मात्र, त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो, हे लक्षात आल्यावर ते बदलायचं ठरलं. फॉरेंसिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरेनं ब्लड सॅम्पल बदलायला सांगितलं. रविवारी पुणे पोलिसांना ब्लड रिपोर्ट मिळाले. मात्र, त्यात फेरफार झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी पुढील कारवाई केली. सोमवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना राहत्या घरून अटक केली.

आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात, पैसे फेकले ससूनचे डॉक्टरही मॅनेज झाले; बिल्डरच्या पोरासाठी भ्रष्ट यंत्रणा सरसावल्या
Amit Shah: ठाकरेंना भाजपपासून शरद पवारांनी तोडलं, अमित शहांचा पवारांवर वार, ठाकरेंना साद?

भ्रष्ट डॉक्टर आणि विशाल अगरवाल यांच्यात पैश्यांची देवाण-घेवाण करणारा ससूनच्या शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही अटक झाली. वडगाव शेरीतून एका कारमधून तो 3 लाख रुपये घेऊन आला होता. फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचा प्रमुख असलेला डॉ. तावरे हा अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलाय. तरीही तो अनेक वर्षांपासून ससूनमध्ये ठाण मांडून बसलाय. त्यामुळेच तावरेवर कुणाचा हात आहे यावरून राजकारण रंगलंय.

कधी किडनी रॅकेटमुळे तर कधी ललित पाटलाच्या ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यातलं ससून हॉस्पिटल यापूर्वीच वादात सापडलंय. मात्र तरीही इथले तावरेंसारखे डॉक्टर पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्रॉईव्ह प्रकरणामुळे सिद्ध झालंय.

आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात, पैसे फेकले ससूनचे डॉक्टरही मॅनेज झाले; बिल्डरच्या पोरासाठी भ्रष्ट यंत्रणा सरसावल्या
Maharashtra Politics: विधानसभेत 'दादा'गिरी चालणार? अजित गटाला विधानसभेत हव्यात 80-90 जागा

दोन जणांचा बळी घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पोलीस अधिका-यापासून हॉस्पिटलच्या शिपायापर्यंत सर्वच कामाला लागले. पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सरकारी यंत्रणांमधल्या भ्रष्ट व्यवस्थेचा पुन्हा एकदा पर्दाफाश केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com