Pune Porsche Accident: पुण्यात पब बारसाठी अधिका-यांचं रेट कार्ड; पब,बारमधून होतेय कोट्यवधींची हप्ते वसुली

Pune Porsche Accident Case Update: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होतायत. या प्रकरणामुळे पुण्यातील पब, बारमध्ये पोलिसांचे हप्ते घेतलं जात असल्याचा आरोप केला जातोय.
Pune Drunk And Drive Case: पुण्यात पब बारसाठी अधिका-यांचं रेट कार्ड; पब,बारमधून होतेय कोट्यवधींची हप्ते वसुली
Pune Pub NewsSaam Tv

तन्मय टिल्लू , साम प्रतिनिधी

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाय. पुण्यातील पब आणि बार मालकांकडून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी महिन्याला लाखो रुपये हप्ता वसूल करत असल्याचा आरोप धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी केलाय.

Pune Drunk And Drive Case: पुण्यात पब बारसाठी अधिका-यांचं रेट कार्ड; पब,बारमधून होतेय कोट्यवधींची हप्ते वसुली
Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होतायत. एकीकडे अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार उघड झालीय. तर दुसरीकडे पुणे उत्पादन शुल्कच्या अधिकारी पब आणि बारकडून दरमाह कोट्यवधींचे हप्ते वसूल करत असल्याचा पर्दाफाश झालाय. आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी या अधिका-यांचं रेटकार्डच वाचून दाखवलंय. तसेच बार आणि रेस्टोरंटवर कारवाई करावी अन्यथा आम्ही बुलडोझर घेऊन कारवाई करणार असल्याचा इशारा अंधारेंनी दिला. अंधारेंनी जाहीर केलेलं रेटकार्ड काय आहे पाहूया.

पुणे अधिकाऱ्यांचं पब-बारसाठी रेट कार्ड

लेट नाईट- 1 लाख

राज बाहादर मील-1 लाख

बॅक स्टेज - 90 हजार

स्काय स्टोरी -50 हजार

जीप्सी दी धाबा -50 हजार

रुड लाऊन्ज- 60 हजार

रेस्टोबार -50 हजार

हॉली डे भूकंप -1 लाख

सरोवर हॉटेल 1 लाख

जीप्सी हॉटेल -50 हजार

पुण्यात उत्पादन शुल्कचे अधिकारी महिन्याला 70 लाख वसूल करत असल्याचा गंभीर आरोप धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केलाय. पुण्यातील पब आणि बार मालकांकडून वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांना टार्गेट दिलं जात असल्याचा गौप्यस्फोट धंगेकरांनी केलाय. कोणत्या अधिका-यांचा समावेश आहे ते पाहूयात. धंगेकर म्हणतात, हे एक्साईज अधिकारी हप्तेखोर

सागर धुर्वे

तात्या शिंदे

समीर पडवळ

स्वप्नील दरेकर

गोरे मेजर

गोपाल कानडे

78 लाख रूपये महिना हप्तावसुली

2 वर्षांत नव्या लायसन्सचा अडीच कोटी हप्ता

गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातले पब आणि बार लवकर बंद करावेत अशी मागणी वारंवार होत होती. मात्र यावर पोलिसांपासून उत्पादन शुल्क अधिका-यांपर्यंत सर्व मौन धारण करून होते. या मौनामागे कोट्यवधींची हप्तेवसुली तर नव्हती ना असा सवाल आता उपस्थित होतोय. या ड्रंक अँक ड्राईव्हमुळे भ्रष्ट सरकारी यंत्रणांची लक्तरं मात्र वेशीला टांगली गेली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com