Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती

Pune Sassoon Hospital Dr Ajay Taware: पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत डॉ. श्रीहरी हरलोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना देखील पोलिसांनी अटक केलीये.
Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती
Pune Sassoon Hospital Dr Ajay TawareSaam Tv

सागर आव्हाड, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Hit And Run Case) अटक करण्यात आलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. मी सर्वांची नावे घेणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांची नावं समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत डॉ. श्रीहरी हरलोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना देखील पोलिसांनी अटक केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अपघात प्रकरणी अटक केलेले डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अजय तावरे यांनी पुणे पोलिसांना कारवाई दरम्यान सांगितले की, 'मला ज्यापद्धतीने अटक केली. माझे नाव ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यापद्धतीने मला कुणाचे फोन आले होते याची नावं देखील मी घेणार आहे. मी शांत बसणार नाही' त्यामुळे आता डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे पुणे पोलिसांसोबत सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव समोर आले आहे. त्याबाजून पोलिस तपास करत आहेत.

Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्ट बदलला; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क केला होता. एका लोकप्रतिनिधीने फोनवरून डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितले असल्याचे तापसात उघड झाले आहे. याप्रकरणी आजच पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे दोन्ही डॉक्टर आणि शिपायाला अटक केली.

Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती
Pune News : रवींद्र धंगेकरांनी दोन दिवसांत माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफांचा इशारा

दरम्यान पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हरलोर यांनी मिळून आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या ब्लडचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याप्रकरणी या दोन्ही डॉक्टरांविरोधात भादवि १२० ब, ४६७, २०१, २१२, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे.

Pune Porsche Car Accident Update: मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती
Pune Porsche Accident: 'रुग्णालय की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?' ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोर्शे अपघातावरुन विरोधकांनी घेरलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com