
निलेश घायवळविरोधात मोठी कारवाई.
घरांवर छापेमारी.
मोठं घबाड सापडलं.
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर मकोका अतंर्गत कारवाईतून सुटून परदेशात फरार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घायवळविरूद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांनी घायवळच्या घरांवर छापेमारीला सुरूवात केली आहे
गेल्या २ दिवसांपासून घायवळप्रकरणात पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकानं घायवळच्या पुण्यातील विविध ठिकाणांवरील घरांवर छापेमारी केली. घायवळच्या घरांवर केलेल्या छापेमारीत पोलिसांनी बऱ्याच वस्तू सापडल्या. बंदुकीच्या जिवंत गोळ्या, रिकामे पुंगळे, यासह महत्वाची कागदपत्रे पोलिसांना सापडले.
पोलिसांनी घायवळच्या घरात सापडलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. यासह घायवळच्या मालकीचे सातबारे, साठेखत, तसेच मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाईल्सही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
घायवळचे अनेक बेकायदेशीर मालमत्ता आहे. या बेकायदेशीर मालमत्ता तसेच बांधकामाविरोधात पुणे महानगरपालिकेला पोलिसांनी अधिकृत पत्र पाठवले आहे. पत्र प्राप्त होताच मनपाने हालचाली सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, घायवळच्या अधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या संपत्तीवर सील आणि जप्तीची प्रक्रिया हाती घेतली जाणार असल्याची माहिती आहे.
मनपाकडून लवकरच घायवळच्या प्रॉपर्टीवर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केले. नंतर परदेशात पलायन केलं. पुणे पोलीस आयुक्तालयानं पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासह बँक खाती गोठवणे आणि बेकायदा मालमत्ता जप्त करणे याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.